नवीन कात्रज बोगदा धोकादायक जपानच्या पथकाकडून पाहणी; उपाययोजनांवर आज बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवीन कात्रज बोगदा धोकादायक
जपानच्या पथकाकडून पाहणी; उपाययोजनांवर आज बैठक
नवीन कात्रज बोगदा धोकादायक जपानच्या पथकाकडून पाहणी; उपाययोजनांवर आज बैठक

नवीन कात्रज बोगदा धोकादायक जपानच्या पथकाकडून पाहणी; उपाययोजनांवर आज बैठक

sakal_logo
By

पुणे, ता. २१ : पावसामुळे सतत गळणारे पाणी, कोसळणारे दगड या कारणांमुळे पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील कात्रजचा शिंदेवाडीजवळील नवा बोगदा धोकादायक स्थितीपर्यंत पोचला असल्याच्या निष्कर्षाप्रत तज्ज्ञ पोचले आहेत. त्यामुळे सुरक्षिततेच्या उपाययोजना सुचविण्यासाठी जपानवरून तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. उपाययोजनांची आखणी करून तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने शुक्रवारी बैठक आयोजित केली आहे.

शिंदेवाडी बोगद्याजवळ वारंवार अपघात होतात. तसेच तेथे पाणी साठून अनेकदा दुर्घटनाही झालेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बोगद्याला आता गळतीचे आणि दरड कोसळण्याचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे या बोगद्याची पाहणी करण्यासाठी गुरुवारी जपानहून एक पथक पुण्यात दाखल झाले. कात्रजचा नवीन व खंबाटकी या दोन्ही बोगद्यांच्या कामाची पाहणी करून शुक्रवारच्या बैठकीत आवश्यक त्या सूचना देणार आहेत. बोगद्यातून दररोज सुमारे ५० हजार वाहनांची वाहतूक होते.

महामार्गावर खंबाटकी घाटात ६ लेनचा नवीन बोगदा बांधला जात आहे. ६ किलोमीटरच्या या बोगद्याचे काम पूर्ण झाल्यावर प्रवाशांच्या वेळेत १५ ते २० मिनिटांची बचत होईल. अल्पावधीत त्याचे काम पूर्ण होणार आहे. गुरुवारी जपानच्या ‘जायका’ या संस्थेच्या बोगद्याचे तज्ज्ञ असलेल्या पथकांनी त्याचीही पाहणी केली. यात बोगद्याच्या स्ट्रक्चरसह अन्य तांत्रिक बाबीदेखील पाहण्यात आल्या.

पुणे-सातारा रस्ता यापूर्वी दोन पदरी होता. त्याच्या चौपदरीकरणासाठी केंद्र सरकारने ४ फेबुवारी १९९९ रोजी अधिसूचना काढली. त्यावेळी याचा खर्च ६१० कोटी रुपये झाला. २००४ मध्ये काम पूर्ण झाल्यावर आणेवाडी (सातारा) येथे ४ मार्च २००५ आणि खेड शिवापूर (पुणे) येथे ८ मार्च २००६ रोजी टोल सुरू झाला. हा रस्ता सहापदरी करण्याचे काम १ ऑक्टोबर २०१० रोजी सुरू झाले. ते मार्च २०१३पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. पण कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे ते अद्याप पूर्ण झालेले नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही त्याबाबत वारंवार जाहीररीत्या नाराजी व्यक्त केली आहे.

पुणे-सातारा महामार्गाविषयी अनेक गैरकारभार घडले आहे. त्याची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत.
- संजय शिरोडकर, पुणे-सातारा रस्ता अभ्यासक

Web Title: Todays Latest Marathi News Pne22n85883 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top