दिव्यांग फसवणूकप्रकरणी दोषारोपपत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यांग फसवणूकप्रकरणी दोषारोपपत्र
दिव्यांग फसवणूकप्रकरणी दोषारोपपत्र

दिव्यांग फसवणूकप्रकरणी दोषारोपपत्र

sakal_logo
By

पुणे, ता. २१ : चांगल्या परताव्याच्या आमिषाने ५७० हून अधिक दिव्यांगांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने सहा जणांना अटक करून त्यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. फसवणूक झालेल्यांना प्लेटिनियम इन्वेस्टमेंट अ‍ॅण्ड फायनान्स ग्लोबल सोल्यूशन व सुयो अभियान एंटरप्रायझेस या कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष देण्यात आले होते.
अभिजर सैफुद्दीन घोडनदीवाला (३२), प्रदीप महारूद्र कोलते (२९), सुयोग सुधीर मेहता (३३), चंचल सुयोग मेहता (३२), धनंजय सुदामराव जगताप (३९) आणि मिहीर संतोष गोखले (३६) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आरोपींकडून दोन लॅपटॉप, दोन सिपीयु, पाच हार्डडिक्स, आठ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. तसेच त्याच्या बँकांची खाती देखील गोठविण्यात आली आहेत. गुन्ह्यातील फिर्यादी, आरोपी, तसेच साक्षीदार हे दिव्यांग आहेत. त्यांच्याकडे पास करून ४६७ दिव्यांग साक्षीदारांशी संवाद साधून पुरावे गोळा करण्यात आले आहेत. जास्तीची रक्कम घेतलेल्यांपैकी ६० लोकांकडून रकमा न्यायालयाच्या आदेशानुसार परत मिळविल्या आहेत. सुमारे एक कोटी रुपयांची रक्कम न्यायालयात जमा करण्यात आली आहे. या गुन्ह्यात अटक आरोपींकडून ज्या गुंतवणुकदारांना जास्तीच्या रकमा मिळाल्या आहेत त्यांनी त्या न्यायालयात डीडीद्वारे जमा करण्याचे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक पोलिस आयुक्त विजयकुमार पळसुले, सहायक पोलिस निरीक्षक अमोल काळे यांनी गुन्ह्याचा तपास केला. त्यांना निशांत रणावरे, अर्चना चौहान, मंगल बारावकर, संतोष भोर यांनी मदत केली.

साठ दिवसांत रक्कम दुप्पटचे आमिष
आरोपींनी गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम ४५ ते ६० दिवसांत दुप्पट होर्इल, असे आमिष दाखवले होते. या फसव्या योजनेचा प्रचार करण्यासाठी त्यांनी पॅम्प्लेट, व्हिडिओ तयार करून त्यांना व्हॉट्सॲपवर पाठवले होते. नंतर आरोपींनी स्वतःच्या व कंपनीच्या खात्यावर रकमा स्वीकारल्या होत्या. यामध्ये ५७० जणांची फसवणूक झाली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22n85904 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..