थकबाकीदारांची नावे जाहीर करा सजग नागरिक मंचाची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थकबाकीदारांची नावे जाहीर करा
सजग नागरिक मंचाची मागणी
थकबाकीदारांची नावे जाहीर करा सजग नागरिक मंचाची मागणी

थकबाकीदारांची नावे जाहीर करा सजग नागरिक मंचाची मागणी

sakal_logo
By

पुणे, ता. २१ : स्टेट बँक ऑफ इंडियाने नऊ वर्षांत थकबाकीदारांचे २ लाख ७८ हजार ६०५ कोटी रुपये राईट ऑफ (निर्लेखित) केले. त्यामध्ये बड्या थकबाकीदारांचे १ लाख ४५ हजार २४८ कोटी रुपये असून, त्यांच्याकडून केवळ १९ हजार ६७८ कोटी रुपयांची आजपर्यंत वसुली झाली. एकूण थकबाकीच्या रकमेच्या फक्त १३ टक्के थकबाकीची वसुली केली आहे. परंतु या बड्या थकबाकीदारांची नावे जाहीर करायला बँकेने नकार दिला आहे. यावरून पारदर्शकतेचा दावा करणारी ही बँक प्रत्यक्षात माहिती कशी दडविते, याचे हे उत्तम उदाहरण आहे, अशी टीका सजग नागरिक मंचाने केली आहे.

बँकांकडून कर्जाचे तांत्रिक राईट ऑफ करण्यावरून मध्यंतरी गदारोळ झाला होता. तेव्हा राईट ऑफ करणे म्हणजे म्हणजे कर्जमाफी नाही. अशा कर्जाची वसुली सुरूच राहते, असे बँकेकडून सांगण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारक म्हणून गेल्या ९ वर्षांत दरवर्षी १०० कोटींच्यावर थकीत कर्ज असलेल्या आणि तांत्रिकदृष्ट्या राईट ऑफ केलेल्या कर्जखातेदारांची नावे व रक्कम मंचाच्या वतीने मागण्यात आली होती. तसेच त्यापैकी किती वसुली झाली, याबद्दलची माहितीदेखील माहिती अधिकारात मागितली होती. परंतु, बँकेने गोपनीयतेच्या नावाखाली ही माहिती देण्यास नकार दिला. दोन वर्षांपूर्वी हीच माहिती बॅंकेने भागधारक म्हणून दिली होती. यंदा मात्र नाकारली, असे मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22n85922 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..