आगरकरनगरमध्ये चोरी एक लाखाचा ऐवज लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आगरकरनगरमध्ये चोरी
एक लाखाचा ऐवज लंपास
आगरकरनगरमध्ये चोरी एक लाखाचा ऐवज लंपास

आगरकरनगरमध्ये चोरी एक लाखाचा ऐवज लंपास

sakal_logo
By

पुणे, ता. २१ : परदेशात गेलेल्या नागरिकाच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील चांदी, रोख रक्कम व अमेरिकन चलन असा एक लाख रुपयांचा ऐवज चोरला. ही घटना मंगळवारी पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास पुणे स्टेशनजवळील आगरकरनगर परिसरात घडली.

या प्रकरणी सदनिकाधारक पीयूष जयसिंघानी यांच्या नातेवाइकांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयसिंघानी हे कपड्याचे व्यापारी आहेत. त्यांचे परदेशात कपड्याचे दुकान असून त्यांच्या कुटुंबीयांसमवेत ते तेथे राहतात. तर पुणे स्टेशनजवळील अलंकार चौकापासून काही अंतरावरच असणाऱ्या आगरकरनगरमधील सन्मित सोसायटीमध्ये त्यांची सदनिका आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून त्यांची सदनिका बंद होती. मंगळवारी (ता. १९) पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या सदनिकेचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या बेडरूममधील कपाटात ठेवलेली ४९ हजार रुपये किमतीची एक किलो चांदी, २५ हजार रुपये किमतीचे अमेरिकन चलन व रोख रक्कम असा एकूण एक लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. सकाळी हा प्रकार त्यांच्या शेजाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिसांना खबर दिली. गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणातील एका चोरट्यास अटक केली आहे. सातत्याने होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे परिणामी स्थानिक रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आगरकरनगर परिसरामध्ये रात्रीच्यावेळी पोलिसांची गस्त वाढवावी व चोरीच्या घटना रोखण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22n85970 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..