इंदूर- अमळनेर एसटीचा अपघात चालकाच्या चुकीमुळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदूर- अमळनेर एसटीचा अपघात चालकाच्या चुकीमुळे
इंदूर- अमळनेर एसटीचा अपघात चालकाच्या चुकीमुळे

इंदूर- अमळनेर एसटीचा अपघात चालकाच्या चुकीमुळे

sakal_logo
By

पुणे, ता. २१ ः इंदूर - अमळनेर एसटीचा झालेला अपघात हा बसमधील तांत्रिक दोषांमुळे नाही तर चालकाच्या चुकीमुळे झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. ट्रक ओव्हरटेक करताना चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे पुलाच्या कठड्याला धडक देऊन बस कोसळल्याचे तपासणी अहवालात स्पष्ट झाले आहे.

सोमवारी मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यातील खलघाट येथे इंदूर- अमळनेर एसटीचा अपघात झाला. बलकवाडा येथील खलटाका पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या नर्मदा नदीच्या पुलावर झालेल्या या अपघातात १२ प्रवाशांचा मृत्यू झाला. राज्य परिवहन महामंडळाने या घटनेच्या चौकशीचे आदेश देत तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली. त्याचा अहवाल गुरुवारी सायंकाळी प्राप्त झाला. यात बसमध्ये कोणताही तांत्रिक दोष नसून तो चालकाच्या चुकीने अपघात झाला असल्याचे म्हटले आहे. तसेच मध्य प्रदेश पोलिसांनी देखील केलेल्या तपासात ट्रकला ओव्हरटेकच्या प्रयत्नात हा अपघात झाला असल्याचे म्हटले आहे.

अपघाताचा अहवाल प्राप्त झाला असून तो चालकाच्या चुकीने झाले असल्याचे असे अहवालात म्हटले आहे. बस मध्ये कोणताही तांत्रिक दोष नव्हता. २६ जून रोजी या बसची आरटीओ कार्यालयात फिटनेस टेस्ट झाली होती.
-शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, राज्य परिवहन महामंडळ, मुंबई.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22n85983 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top