तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्त्याला पोलिस कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तथाकथित माहिती अधिकार 
कार्यकर्त्याला पोलिस कोठडी
तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्त्याला पोलिस कोठडी

तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्त्याला पोलिस कोठडी

sakal_logo
By

पुणे, ता. २२ : दंडात्मक कारवार्इ टाळायची असेल तर मला दोन कोटी रुपयांची खंडणी द्यावी लागेल, असे धमकावत त्यातील २५ लाख रुपये स्वीकारणाऱ्या तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्त्याला न्यायालयाने २५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
दत्तात्रेय गुलाबराव फाळके (वय ४६, रा. मानसिंग रेसिडेन्सी, तळजाई पठार, धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्या तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्त्याचे नाव आहे. संबंधित ठेकेदाराने याबाबत खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार त्याला पथकाने मंगळवारी रात्री (ता. १९) अटक केली आहे. एका बांधकाम ठेकेदाराकडे त्याने ही खंडणी मागितली होती. या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी तसेच आरोपीने अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे याची माहिती घेण्यासाठी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील वर्षाराणी जाधव यांनी केली. या गुन्ह्यात मुळ फिर्यादींच्यावतीने ॲड. हेमंत झंजाड कामकाज पाहत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22n86140 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..