
शिंदेवाडीचा बोगदाजवळ कोणतेही बांधकाम नको जपानच्या पथकाच्या सूचना; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जिल्हा प्रशासनाला पत्र देणार
पुणे, ता. २२ ः शिंदेवाडीच्या बोगद्याची दुरुस्ती करा. तसेच बोगद्याच्या वरच्या रस्त्याचा देखील वापर करू नका, शिवाय कोणतेही नवे बांधकाम करू नका, अशा सूचना जपानच्या बोगदा तज्ञांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहे. त्यानुसार लवकरच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जिल्हा प्रशासनाला बोगद्याजवळ कोणतेही बांधकाम न करण्याविषयीचे पत्र देणार आहे.
गेल्या काही दिवसांत पावसामुळे सतत गळणारे पाणी व कोसळणारे दगड आदी कारणांमुळे पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील कात्रजचा शिंदेवाडीजवळील नवा बोगदा धोकादायक स्थितीपर्यंत पोचला आहे. गुरुवारी जपानच्या तज्ज्ञांनी पाहणी केली. शुक्रवारी झालेल्या बैठकीत त्यांनी या सूचना दिले असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे प्राधिकरण लवकरच जिल्हा प्रशासनाला पत्र लिहून शिंदेवाडीच्या बोगद्याजवळ कोणतेही बांधकामास परवानगी देऊ नका, अशी विनंती करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दररोज सुमारे ५० हजार वाहनांची वाहतूक
शिंदेवाडी बोगद्याजवळ वारंवार अपघात होतात. तसेच तेथे पाणी साठून अनेकदा दुर्घटनाही झालेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बोगद्याला आता गळतीचे आणि दरड कोसळण्याचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे या बोगद्याची पाहणी करण्यासाठी गुरुवारी जपानहून एक पथक पुण्यात दाखल झाले. कात्रजचा नवीन बोगदा व खंबाटकी बोगदा या दोन्ही बोगद्याच्या कामाची पाहणी केली. शुक्रवारच्या बैठकीत याच्या सूचना देण्यात आल्या आहे. लवकरच दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या बोगद्यातून दररोज सुमारे ५० हजार वाहनांची वाहतूक होते.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22n86143 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..