
हातसडीच्या तांदूळ खरेदीची संधी
पुणे, ता. ८ : महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालास बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशाने पुणे जिल्हा परिषदेच्या येत्या गुरुवारपासून (ता.९) जिल्हास्तरीय दोन दिवसीय तांदूळ व डाळ महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवात पुणे व मराठवाड्यातील उस्मानाबाद या दोन जिल्ह्यातील महिला बचत गट सहभागी होणार आहेत. यामुळे पुणेकरांना अस्सल इंद्रायणी, हातसडीचा आणि सेंद्रिय तांदूळ आणि सेंद्रिय उडीद, मटकी, मूग, हरभरा, तूर आदी विविध प्रकारच्या सेंद्रिय डाळी खरेदी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), पुणे आणि उस्मानाबाद जिल्हा परिषदेचा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या विभागाच्या संयुक्त विद्यमाने या तांदूळ व डाळ महोत्सवाचे आयोजन केले आहे. हा महोत्सव येत्या गुरुवारी (ता.९) आणि शुक्रवारी (ता.१०) पुणे जिल्हा परिषदेच्या लष्कर भागातील मुख्यालयात आयोजित केल्याचे पुणे जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी, या उद्देशाने हा दोन दिवशीय महोत्सव आयोजित केला आहे. त्यामुळे पुणेकरांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा आणि महिला बचत गटांच्या आर्थिक उन्नतीसाठी हातभार लावावा, असे आवाहन कडू यांनी केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22o69717 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..