काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांचे तिरडी आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांचे तिरडी आंदोलन
काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांचे तिरडी आंदोलन

काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांचे तिरडी आंदोलन

sakal_logo
By

पुणे, ता. १६ : केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या बालगंधर्व रंगमंदिर येथील कार्यक्रमावेळी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी ‘गॅस सिलिंडरचे तिरडी आंदोलन’ करीत महागाईविरोधी आंदोलन केले. या आंदोलनामध्ये महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत केंद्र सरकारचा निषेध केला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरील पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर येथे होता. या कार्यक्रमासाठी इराणी सोमवारी सायंकाळी बालगंधर्व रंगमंदिरात आल्या होत्या. तत्पूर्वी सायंकाळी पावणेपाच वाजता झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा पूजा आनंद यांच्या नेतृत्वाखाली शंभर ते दीडशे महिलांनी आंदोलन केले. या वेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, मोहन जोशी, अभय छाजेड, मनीष आनंद, कमल व्यवहारे, संगीता तिवारी, वैशाली मराठे, सुजाता शेट्टी, मीरा शिंदे आदींनी सहभाग घेतला.

सुमारे तासभर आंदोलन केल्यानंतर महिला घोषणा देत काँग्रेस भवनामध्ये गेल्या. दरम्यान, तेथे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.

फोटो नं : ६४७१७

Web Title: Todays Latest Marathi News Pne22o85512 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top