पुण्यात पावसाच्या हलक्या सरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात पावसाच्या हलक्या सरी
पुण्यात पावसाच्या हलक्या सरी

पुण्यात पावसाच्या हलक्या सरी

sakal_logo
By

पुणे, ता. १ ः जुलैच्या सुरवातीलाच पुणे व परिसरात पावसाने कमबॅक केला आहे. संपूर्ण जून महिन्यात दडी मारलेल्या पावसाचे आगमन झाले आहे. शहर व परिसरात पावसाने हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली. पुढील आठवडाभरही पावसाच्या हलक्या सरी अशाच कायम राहणार असल्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

शहरात शुक्रवारी (ता. १) सायंकाळपर्यंत ४.१ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. गुरुवारी (ता. ३०) सायंकाळी सुरू झालेला पाऊस शुक्रवारी (ता. १) दुपारपर्यंत कायम होता. पावसाची संततधार कायम असल्याने रस्त्यावरही पाणी साचले. हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या गुरुवारपर्यंत (ता. ७) ढगाळ वातावरण कायम राहणार असून, हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पावसाला सुरवात झाली असली तरी अद्याप जोरदार पावसाची प्रतिक्षा पुणेकरांना आहे.
----------------------
पुण्यातील पावसाची नोंद (मिलिमीटरमध्ये)
पुणे ः ४.१
पाषाण ः ५.२
लोहगाव ः ०.८
लवळे ः ७
मगरपट्टा ः १
-------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22p07445 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..