बोगस बियांणाद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोगस बियांणाद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक
बोगस बियांणाद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक

बोगस बियांणाद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक

sakal_logo
By

पुणे, ता. २० ः महाराष्ट्रातील खते, बियाणे आणि कीटकनाशकांच्या नमुन्यातील नापास नमुन्यांची टक्केवारी दरवर्षी वाढत असल्याचे आढळून आले आहे. या बोगस बियाणे, खते आणि कीटकनाशकाद्वारे शेतकऱ्यांची लूट आणि फसवणूक होत आहे. याचे बळी ठरलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली.

बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे राज्य संघटक विजय कुंभार, आम आदमी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बिपिन पाटील, संघटक बाबासाहेब चव्हाण, सल्लागार श्रीकांत आचार्य, राज्य प्रवक्ते अभिजित मोरे यांनी या मागण्या केल्या.

‘आम आदमी शेतकरी संघटनेतर्फे २०१५-१६ ते २०२१-२२ या कालावधीतील राज्यातील खते, बियाणे आणि कीटकनाशके यांच्या सरकारकडे प्राप्त नमुन्यांच्या गुणवत्तेबाबतची माहिती कृषी आयुक्तालयाकडे विचारण्यात आली, यातून हा खुलासा झाला. बियाण्यांच्या तपासलेल्या नमुन्यांपैकी नापास नमुन्यांची टक्केवारी २०१५-२६ मध्ये ३.८५ टक्के होती, तर २०२०-२१ मध्ये तीच १२ टक्के आणि २०२१-२२ मध्ये ८.५४ टक्के झाली आहे. खतांबाबत ही टक्केवारी कायम राहिली असून, कीटकनाशकांच्या टक्केवारीत घट झाली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे राज्यात या तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळांची संख्याही कमी आहे’, असे पाटील यांनी सांगितले.

कुंभार म्हणाले, ‘‘याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. त्यामुळे राज्य सरकारने याबाबत तातडीने पावले उचलावीत. बोगस बियाणे, खते आणि कीटकनाशके पुरवणाऱ्या कंपन्यांवर वेगाने दंडात्मक कारवाई होण्यासाठी कृषी न्यायालयांची स्थापना करावी, याचे बळी ठरलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, प्रयोगशाळांची संख्या वाढवावी, कृषी विभागातील रिक्त असलेली ९००० पदे तातडीने भरावी, अशा आमच्या मागण्या आहेत.’’

Web Title: Todays Latest Marathi News Pne22p72770 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..