विविध कार्यक्रमांनी अजित पवार यांचा वाढदिवस उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विविध कार्यक्रमांनी अजित पवार यांचा वाढदिवस उत्साहात
विविध कार्यक्रमांनी अजित पवार यांचा वाढदिवस उत्साहात

विविध कार्यक्रमांनी अजित पवार यांचा वाढदिवस उत्साहात

sakal_logo
By

पुणे, ता. २२ ः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, विविध संस्थांतर्फे सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे शुक्रवारी आयोजन केले होते. यामध्ये संगीत मैफील, पुरस्कार सोहळा, भेटवस्तू आणि साहित्य वाटप आदींचा समावेश होता.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यातर्फे पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संगीत मैफील व कार्यकर्ता सन्मान पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. बालगंधर्व येथे झालेल्या या कार्यक्रमात मराठी व हिंदी गाण्यांच्या मैफलीचा श्रोत्यांनी आनंद लुटला. उपस्थित सर्वांना यावेळी भेटवस्तू दिल्या. तसेच, कार्यकर्त्यांचा सन्मान केला. यावेळी पक्षाचे प्रवक्ते प्रदीप देशमुख, सरचिटणीस प्रवीण सोनी उपस्थित होते.

पक्षाचे शहराध्यक्ष जगताप व श्रीकांत पाटील यांच्या हस्ते छत्री वाटप करण्यात आले. तसेच पक्ष कार्यालयात केक कापून वाढदिवस जल्लोषात साजरा केला. यावेळी संजय गाडे, योगेश वराडे, शशिकांत जगताप आदी उपस्थित होते.

बारामती होस्टेल व्यवस्थापक शिवाजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गोखलेनगरमधील विशेष मुलांसाठी काम करणाऱ्या कामायनी शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी काळे, शिवाजीराव पाडळे, अश्‍विनी खर्से, सतीश दराडे, शाळेच्या विश्‍वस्त लेखा कुलकर्णी, अंकुश काकडे, गुरुप्रसाद आगवणे आदींसह शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22p84761 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..