
शहराध्यक्ष प्रतिक्रिया
देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच आम्हाला सत्ता द्या, चार महिन्यांत आरक्षण मिळवून देतो असे सांगितले होते. हा शब्द त्यांनी पूर्ण केला आहे. न्यायालयात ही याचिका असताना सरकारच्या बाजूने सर्व मुद्दे व्यवस्थित मांडले जावेत यासाठी फडणवीस वकिलांच्या संपर्कात होते, त्यामुळे हे आरक्षण मिळाले आहे.
- जगदीश मुळीक, शहराध्यक्ष, भाजप
ओबीसी समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुकाच होऊ नये असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यापूर्वीच स्पष्ट केले होते. आगामी निवडणुकीत शिवसेना ओबीसी जागांवर सक्षम उमेदवार देऊन त्यांना निवडून आणण्यासाठी सज्ज आहे.
- गजानन थरकुडे, शहरप्रमुख, शिवसेना
सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश ओबीसी बांधवांचा आणि महाविकास आघाडी सरकारने केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचा मोठा विजय आहे. आरक्षण कायम राहिले याचा आनंद आहे.
- प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
या आरक्षणासाठी काँग्रेसने पहिल्यापासूनच पाठपुरावा केला असून, महाविकास आघाडीच्या एकत्रित प्रयत्नाने सर्वोच्च न्यायालयातील लढाई जिंकली याचा आनंद आहे.
- अरविंद शिंदे, प्रभारी शहराध्यक्ष, काँग्रेस
लोकसंख्या वाढत असताना आरक्षण ५२ टक्क्यांवरून ३७ टक्क्यांवर आले आहेत. संख्या कमी होत चालल्याने ओबीसी समाजाने सावध होणे आवश्यक आहे. सर्वेक्षणात राज्यात काही ठिकाणी शून्य टक्के ओबीसी समाज दाखवला आहे. त्यामुळे आरक्षण देण्याचा खरा मार्ग सर्वेक्षण किंवा अहवाल नसून, जनगणना हाच आहे.
- विजय कुंभार, कार्याध्यक्ष, आप
Web Title: Todays Latest Marathi News Pne22q21910 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..