निधन बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन बातमी
निधन बातमी

निधन बातमी

sakal_logo
By

‘सिर्फ’चे संस्थापक
योगेश चिथडे यांचे निधन

पुणे, ता. २०
सैनिकांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या ‘सिर्फ’ (सोल्जर्स इडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फौंडेशन) संस्थेचे संस्थापक योगेश गंगाधर चिथडे (६१) यांचे आज संध्याकाळी अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे आई, वडील, पत्नी, मुलगा मेजर हृषिकेष, सून असा परिवार आहे.
सियाचीन भागात सैनिकांसाठी ऑक्सिजनचा प्लॅंट उभारण्यासाठी योगेश व त्यांच्या पत्नी सुमेधा यांनी पुढाकार घेतला व ते काम पूर्ण केले. काश्मीरमध्येही त्यांनी दिलेला ऑक्सिजन प्लॅंट अलीकडेच कार्यरत झाला. यासाठी या दोघांनी समाजातून निधी उभा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच (दिवंगत) सरसेनाध्यक्ष बिपिन रावत यांनी त्यांच्या कामाची दखल घेऊन समाधान व्यक्त केले होते. हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी चिथडे यांनी विविध उपक्रम राबवले. त्यांनी स्वतःही भारतीय हवाई दलात आठ वर्षे काम केले होते. उद्या सकाळी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
( फोटोः ७९०५४)

Web Title: Todays Latest Marathi News Pne22q90553 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top