सराफ दुकानदारावर वार; दरोड्याचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सराफ दुकानदारावर वार; दरोड्याचा प्रयत्न
सराफ दुकानदारावर वार; दरोड्याचा प्रयत्न

सराफ दुकानदारावर वार; दरोड्याचा प्रयत्न

sakal_logo
By

पुणे, ता. २० ः भरदिवसा दुकानात घुसलेल्या चोरट्यांनी सराफ व्यावसायिकावर चाकूने वार करून दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुकानदाराने आरडाओरडा केल्याने चोरटे पळून गेले. या घटनेत सराफ दुकानदार गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी कात्रजजवळील आंबेगाव बुद्रूक येथे घडली. विनोदकुमार सोनी (वय ४२, रा. आंबेगाव बुद्रूक) असे या घटनेत जखमी झालेल्या व्यावसायिकाचे आहेत. याप्रकरणी सोनी यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी सोने यांचे आंबेगाव बुद्रूक परिसरात वैभवलक्ष्मी ज्वेलर्स नावाची सराफ पेढी आहे. गुरुवारी सायंकाळी सोनी त्यांच्या दुकानामध्ये बसले होते. त्यावेळी त्यांच्या दुकानासमोर एक वाहन येऊन उभे राहिले. त्यातून उतरलेल्या काही व्यक्ती सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात आल्या. त्यानंतर त्यांनी थेट दुकानदार सोनी यांच्यावर चाकूने वार केले. या घटनेमुळे प्रसंगावधान राखत सोनी यांनी चोरट्यांचा प्रतिकार करीत मोठमोठ्याने आरडाओरडा केला. या घटनेमुळे चोरट्यांनी त्यांच्या वाहनातून तत्काळ पळ काढला. पोलिसांनी सराफी पेढीच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले असून चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना केली आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r04234 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top