
एनडीए २ प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची सुरुवात
पुणे, ता. २० ः देशातील तरुण-तरुणींना लष्करात जाण्याची संधी मिळणार आहे. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) या तिन्ही दलांना दर्जेदार अधिकारी पुरविणाऱ्या संस्थेची प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने (यूपीएससी) एनडीए प्रवेश प्रक्रियेअंतर्गत घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांना ७ जून पर्यंत अर्ज भरता येणार आहे.
ही प्रवेश प्रक्रिया एनडीएच्या १५० वी आणि नेव्हल ॲकॅडमीच्या ११२ व्या तुकडीसाठी असून यामध्ये एकूण ४०० जागा राखीव आहेत. या ४०० पैकी ३७० जागा एनडीएसाठी असून १९ जागा मुलींसाठी राखीव ठेवल्या आहेत. तर नेव्हल ॲकॅडमीसाठी ३० जागा असून ही प्रवेश प्रक्रिया केवळ मुलांसाठी आहे. बारावी उत्तीर्ण झालेल्या व बारावीत असलेल्या मुला-मुलींना या प्रवेश प्रक्रियेत सहभाग घेता येणार आहे. यासाठी वयोमर्यादा देखील ठेवली आहे.
एनडीएची परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार असून लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या मुलाखती (एसएसबी) द्याव्या लागणार. त्यानंतर वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया पार पडेल. या प्रक्रियेतून निवडण्यात आलेल्या उमेदवारांना एनडीएमध्ये तीन वर्षांच्या प्रशिक्षण दिले जाईल. हे प्रशिक्षण जुलै २०२३ पासून सुरू होईल.
एनडीए प्रवेश प्रक्रियेशी निगडित माहिती व अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी upsconline.nic.in या संकेतस्थळाचा वापर करावा.
असा करा अर्ज ः
- यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या- upsconline.nic.in
- तुमचा तपशील वापरून ऑनलाइन अर्जासाठी नोंदणी करा
- नोंदणी केल्यानंतर, तुमचा अर्ज भरा
- अर्ज भरताना संबंधित कागदपत्रे अपलोड करा
- त्यानंतर अर्ज सबमिट करा
Web Title: Todays Latest Marathi News Pne22r04299 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..