पुणे स्थानकाला दहा व्हीलचेअर भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे स्थानकाला दहा व्हीलचेअर भेट
पुणे स्थानकाला दहा व्हीलचेअर भेट

पुणे स्थानकाला दहा व्हीलचेअर भेट

sakal_logo
By

पुणे, ता. २० ः पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीच्या वतीने दहा व्हीलचेअर भेट दिले. ‘शताब्दी वर्ष कृतज्ञतापर्व’ या कार्यक्रमाअंतर्गत ही भेट दिली. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा, मधुरिमाराजे मालोजीराजे छत्रपती आणि यशराजराजे मालोजीराजे छत्रपती यांची उपस्थिती होती.

छत्रपती मधुरिमाराजे म्हणाल्या, ‘‘छत्रपती शाहू महाराजांनी दूरदृष्टी ठेवून त्या काळात घेतलेले निर्णय आजही समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. तळागाळातील लोकांच्या समस्या जाणून घेऊन राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्यावर अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन काम केल्यास आपण त्यांच्याप्रती कृतज्ञताभाव व्यक्त करू शकतो.
डीआरएम रेणू शर्मा म्हणाल्या, ‘‘व्हील चेयरचा दिव्यांग, रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, प्रवाशांना नक्कीच याचा फायदा होणार आहे. सामाजिक संस्थांनी सामाजिक हेतूसाठी पुढे येऊन कार्य करणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, स्थानक संचालक सुरेशचंद्र जैन, आदी अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r04383 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..