
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आज वेबिनार नेतृत्व कौशल्यवाढीबद्दल होणार मार्गदर्शन
पुणे, ता. २० : सकाळ माध्यम समूहाच्या सकाळ इंडिया फाउंडेशन व यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क यांच्यावतीने आणि यांची पुण्यातील सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील सर्व विद्याशाखांमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘एकविसाव्या शतकात नेतृत्व विकासासाठी आवश्यक असणारे कौशल्य व गुण’ या विषयावर शनिवारी झूम वेबिनारच्या माध्यमातून मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली आहे.
लेखक, ग्रोथ माइंडसेट प्रशिक्षक, टेडेक्स आणि जनवाईस या विविध विषयांवरील ऑनलाइन मार्गदर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या प्लॅटफॉर्मवरील मार्गदर्शक रामजी वल्लथ व गुगल इंडियाच्या पीपल ऑपरेशन विभागाच्या माजी प्रमुख आणि सध्या एच. आर. सल्लागार म्हणून कार्यरत असलेल्या जयश्री राममूर्ती शनिवारी (ता. २१) दुपारी १२ वाजता झूम वेबिनारच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत.
याबाबत होणार मार्गदर्शन
नेतृत्व कौशल्य व गुण म्हणजे काय?
नेतृत्व कौशल्य कसे विकसित करावे
नेतृत्व विकास आणि कौशल्याधिष्ठित शिक्षण
नेतृत्वाचे तंत्र, प्रकार, भूमिका आणि व्यक्तिमत्त्व
वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी खाली दिलेला क्यू आर कोड स्कॅन करून रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्या ईमेल आयडीवर झूम वेबिनारची लिंक, आयडी व पासवर्ड मिळेल.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22r04394 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..