‘लाल महाल बदनाम करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘लाल महाल बदनाम करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा’
‘लाल महाल बदनाम करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा’

‘लाल महाल बदनाम करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा’

sakal_logo
By

पुणे, ता. २१ : लाल महालात तमाशातील गाण्यांवर लहान मुलींचे नृत्याचे आयोजन करून लाल महाल बदनाम केला जात आहे. ही बदनामी करणाऱ्यांवर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ‘संभाजी ब्रिगेड’च्या विकास पासलकर यांनी केली आहे.

महापालिकेने उन्हाळ्याच्या सुटीत लाल महाल बंद ठेवला आहे. पुणे शहरात हजारो पर्यटक जिजाऊ व शिवरायांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात. मात्र तरीदेखील पालिका व तेथील सुरक्षारक्षकांकडून लाल महाल बंद ठेवण्यात आलेला आहे. मात्र, दुसरीकडे याच लाल महालात रिल्स काढण्याच्या नादात चित्रपटातील तमाशाच्या गाण्यावर मुलींच्या नृत्याचे कार्यक्रम केले जात असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.

या घाणेरड्या व्हीडिओसंदर्भात तीन दिवसांपूर्वी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे संभाजी ब्रिगेडच्यावतीने तक्रार करण्यात आलेली आहे. या घटनेच्या पाठीमागे खूप मोठे षडयंत्र आहे. हे षडयंत्र रचणारे व त्यांना साथ देणारे कोण आहेत, याचा शोध घेतला पाहिजे. या घटनेचा शुक्रवारी (ता. २०) लाल महालात जाऊन निषेध करण्यात आला. या वेळी जिजाऊ व शिवरायांना पुष्पहार अर्पण करून निषेध नोंदविण्यात आला. या प्रसंगी अरविंद शिंदे, बाळासाहेब बोडके, प्रशांत धुमाळ, संतोष शिंदे, मंदार बहिरट आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r04452 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..