देशपांडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदिवासींना मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देशपांडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदिवासींना मदत
देशपांडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदिवासींना मदत

देशपांडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदिवासींना मदत

sakal_logo
By

पुणे, ता. २१ : संपूर्ण बांबू केंद्राच्या माध्यमातून आदिवासींना स्वयंपूर्ण करण्याचा प्रकल्प राबविणाऱ्या सुनील देशपांडे यांना कार्यानेच श्रद्धांजली वाहणे समर्पक ठरेल, असे प्रतिपादन ‘देणे समाजाचे’च्या संयोजिका वीणा गोखले यांनी केले. देशपांडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मेळघाट मित्र मंडळातर्फे आयोजित ‘वापरलेल्या कपड्यांचे संकलन मोहिमे’च्या उद्‍घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. देशपांडे यांच्या कार्याचा आणि जीवनाचा परिचय करून देणाऱ्या एका छोटेखानी प्रदर्शनाचे उद्‍घाटन या वेळी झाले.

देशपांडे यांनी मेळघाटातील लवादा आणि कोठा येथे ग्राम ज्ञानपीठाच्या माध्यमातून आदिवासींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांनी कार्य केले. कोरोनाकाळात भारतभर कामाच्या शोधात गेलेल्या सुमारे दीड हजारांहून अधिक आदिवासींना त्यांनी मेळघाटात सुखरूप येण्यासाठी मेहनत घेतली. तसेच महात्मा गांधी मेडिकल मिशन दवाखान्याच्या माध्यमातून कोरोना उपचारांची सोय करून दिली. कोरोनामुळेच त्यांचे मागील वर्षी नागपुरातील रुग्णालयात निधन झाले.

गरवारे प्रशालेत संकलन
विमलाबाई गरवारे प्रशालेत वापरलेले पण सुस्थितीतील तसेच नवे कपडे या मोहिमेअंतर्गत गोळा करण्यात येत आहे. ते मेळघाटातील लवादा येथील संपूर्ण बांबू केंद्राला पाठविण्यात येणार आहेत. या निमित्ताने संपूर्ण बांबू केंद्राद्वारे निर्मित विविध बांबू उत्पादने, मेळघाटातील रसायन विरहित धान्य, लोणची, औषधी गुणयुक्त नैसर्गिक मध याचे प्रदर्शन आणि विक्रीदेखील आयोजित करण्यात आली आहे. रविवारी (ता. २२) सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत हे प्रदर्शन आणि कपडे संकलन सुरू राहील. धुतलेले आणि सुस्थितीत कपडे देऊन या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r04585 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..