प्रवेश प्रक्रिया : विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग एक भरता येणार अकरावीसाठी ३० मेपासून ऑनलाइन नोंदणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रवेश प्रक्रिया : विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग एक भरता येणार
अकरावीसाठी ३० मेपासून ऑनलाइन नोंदणी
प्रवेश प्रक्रिया : विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग एक भरता येणार अकरावीसाठी ३० मेपासून ऑनलाइन नोंदणी

प्रवेश प्रक्रिया : विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग एक भरता येणार अकरावीसाठी ३० मेपासून ऑनलाइन नोंदणी

sakal_logo
By

पुणे, ता. २१ : इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन नोंदणी व प्रवेश अर्जाचा भाग एक भरण्याची सुविधा येत्या ३० मेपासून उपलब्ध होणार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाच्या संकेतस्थळावर नोंदणी व अर्जाचा भाग एक भरण्यासाठी ‘मॉक डेमो रजिस्ट्रेशन’ म्हणजे प्रवेश अर्ज भरण्याच्या सरावाची सोय २३ ते २७ मे या कालावधीत उपलब्ध असणार आहे.

राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रात अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने करण्यात येते. उर्वरित राज्यात प्रवेश प्रचलित पद्धतीने केले जातात. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचा सराव करण्याची सुविधा प्रवेशाच्या संकेतस्थळावर दिली जाईल. तसेच ‘मॉक डेमो’मध्ये भरलेली माहिती २८ मे रोजी नष्ट करण्यात येईल. त्यानंतर ३० मेपासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अर्ज भरण्यासाठी नव्याने नोंदणी व लॉगिन करून अर्ज भरावा लागणार आहे.

विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रीय प्रवेश फेऱ्यांद्वारे ॲलॉटमेंट मिळवून आणि कोट्याअंतर्गत राखीव जागांवर संबंधित महाविद्यालयाशी संपर्क साधून, अशा दोन प्रकारे प्रवेश घेता येतील. प्रवेशासाठी परवानगी मिळालेल्या महाविद्यालयांनी प्रवेशाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी लॉगिन आयडी आणि पासवर्ड सेट करून महाविद्यालयाची माहिती ऑनलाइन भरून ती शिक्षण उपसंचालकांकडून प्रमाणित करून घ्यावी, असे राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

कोणत्याही कोट्याअंतर्गत राखीव जागा दिलेल्या वेळेत संबंधित विद्यालयांना केंद्रीय प्रवेशासाठी प्रत्यार्पित (सरेंडर) करता येणार आहेत. महाविद्यालयांमध्ये झालेले सर्व प्रवेश त्या-त्या वेळी संकेतस्थळावर नोंदविले जाणार असल्याचे पालकर यांनी सांगितले.

*कोट्याअंतर्गत असे होतील प्रवेश*
- अल्पसंख्याक कोटा : फक्त अल्पसंख्याक कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध असेल. या जागांवर अल्पसंख्याक प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश देता येईल.
- इनहाउस कोटा : त्यांच संस्थेची माध्यमिक शाळा संबंधित विभागात असेल, तर अशा शाळांमधील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लागू.
- व्यवस्थापन कोटा : सर्व विद्यालयांना ऐच्छिक स्वरूपात लागू.

*प्रवेशाचे वेळापत्रक :*
कार्यवाहीचे टप्पे : कालावधी
- मॉक डेमो रजिस्ट्रेशन (सरावासाठी अर्ज भरणे) : येत्या २३ ते २७ मे दरम्यान
-ऑनलाइन विद्यार्थी नोंदणी व प्रवेश अर्जाचा भाग एक भरणे, अर्ज प्रमाणित करून घेणे, लॉगिन आयडी व पासवर्ड वापरून लॉगिन करणे, ऑनलाइन शुल्क भरून फॉर्म लॉक करणे, अर्ज प्रमाणित करण्यासाठी मार्गदर्शन केंद्र निवडणे : ३० मेपासून
- माध्यमिक शाळा/मार्गदर्शक केंद्रांनी विद्यार्थ्यांनी भरलेले प्रवेश अर्ज भाग-एकमधील माहिती तपासून प्रमाणित करणे : ३० मेपासून
- उच्च माध्यमिक शाळा नोंदणी व दुरुस्ती करणे : ३० मे ते राज्यमंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल लागेपर्यंत
- विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग दोनमध्ये प्रवेशासाठी आपल्या पसंतीची कनिष्ठ महाविद्यालये निवडून पसंतीक्रम नोंदविणे : राज्यमंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर सुरू होईल.

अधिक माहितीसाठी संकेतस्थळ : https://11thadmission.org.in

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r04644 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..