‘आर्यन्स ग्रुप’चे प्रकल्प लोकाभिमुख : जगताप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘आर्यन्स ग्रुप’चे प्रकल्प 
लोकाभिमुख : जगताप
‘आर्यन्स ग्रुप’चे प्रकल्प लोकाभिमुख : जगताप

‘आर्यन्स ग्रुप’चे प्रकल्प लोकाभिमुख : जगताप

sakal_logo
By

पुणे, ता. २१ : ‘‘आर्यन्स उद्योग समूहाने विविध क्षेत्रात सुरू केलेले लोकाभिमुख प्रकल्प हे आंतरराष्ट्रीय स्तरावर सामाजिक व आर्थिक व्यवस्थेला बळकटी देतील,’’ असा विश्वास समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोहर जगताप यांनी व्यक्त केला.

आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीजच्यावतीने समुहाच्या विविध प्रकल्पांची घोषणा करण्यासाठी यशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले होते. एरंडवणे भागातील डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलच्या शकुंतला शेट्टी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास समुहाचे अध्यक्ष मुकुंद जगताप, कार्यकारी संचालिका स्मिता शितोळे-जगताप, ओमा फाउंडेशनचे अध्यक्ष अजय जगताप उपस्थित होते.

आर्यन्स समूहातर्फे रिक्षाचालक व विविध क्षेत्रातील पाच हजार कामगारांना वर्षभरासाठी एक लाख रुपयांचा विमा मोफत काढून देण्यात आला आहे. तसेच प्रतिकूल परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्यांना शिवमुद्रा नावाने शिष्यवृत्ती सुरू केली आहे. कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात वैष्णवी ननवरे आणि विश्वजित पवार या दोघांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वयाची कोणतीही अट न घालता शिष्यवृत्ती अखंडितपणे देण्याची घोषणा या वेळी करण्यात आली. जिल्हा न्यायालय चौकातील कामगार पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात येणार असल्याचे समुहाच्यावतीने जाहीर करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r04651 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..