मजबूत संविधनामुळे देशातील लोकशाही टिकून : प्रा. बापट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मजबूत संविधनामुळे देशातील
लोकशाही टिकून : प्रा. बापट
मजबूत संविधनामुळे देशातील लोकशाही टिकून : प्रा. बापट

मजबूत संविधनामुळे देशातील लोकशाही टिकून : प्रा. बापट

sakal_logo
By

पुणे, ता. २१ : ‘‘देशाचे संविधान मजबूत असल्यामुळे गेली ७५ वर्षे भारतात लोकशाही टिकून आहे. पंडित जवाहरलाल नेहरू १७ वर्षे देशाचे पंतप्रधान होते. देशाच्या हितासाठी निर्णय घेताना ते विरोधी पक्षांना विश्र्वासात घेत होते. मात्र, आताचे राजकर्ते नागपूर विद्यापीठाच्या आदेशाशिवाय नेमणूक करत नाही,’’ असे मत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ प्रा. उल्हास बापट यांनी व्यक्त केले.

माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने ‘राष्ट्रीय एकात्मता व सविंधान’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी प्रा बापट बोलत होते. काँग्रेस भवन येथे झालेल्या या कार्यक्रमात शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, दीप्ती चौधरी, ॲड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, गोपाळ तिवारी, अनिल सोंडकर, रमेश अय्यर, पूजा आनंद, रजनी त्रिभुवन, वाल्मीक जगताप आदी उपस्थित होते.

प्रा. बापट म्हणाले, ‘‘जगात काही देश वगळता इतर देशात जेथे लोकशाही होती तेथे काही काळानंतर हुकूमशाही आली. परंतु, भारतातील राज्यकर्ते आणि जनतेचा लोकशाहीवर विश्वास असल्यामुळे लोकशाही टिकून आहे. संविधानामुळे देशातील एकता आणि अखंडता मजबूत आहे. भारत राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असून ते टिकून ठेवण्यासाठी आपण सर्व जणांनी कटिबद्ध राहिले पाहिजे.’’

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r04699 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..