‘ओबीसी’ माहितीसाठी आयोग पुणे दौऱ्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘ओबीसी’ माहितीसाठी आयोग पुणे दौऱ्यावर
‘ओबीसी’ माहितीसाठी आयोग पुणे दौऱ्यावर

‘ओबीसी’ माहितीसाठी आयोग पुणे दौऱ्यावर

sakal_logo
By

पुणे, ता. २१ : सर्वोच्च न्यायालयाने नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) आणि भटके विमुक्तांचे राजकीय आरक्षण अबाधित राहाण्यासाठी ‘ट्रिपल टेस्ट’ची पुर्तता करण्याची सूचना दिली आहे. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने नुकताच अध्यक्ष आणि पाच सदस्यीय आयोग स्थापन केला आहे. हा आयोग ‘इंपिरिकल डाटा’ संकलित करण्यासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आला आहे.
आयोगाने पुणे विभागात भेट दिली आणि ‘ओबीसी’ आणि भटके विमुक्तांचे म्हणणे लेखी स्वरूपात स्वीकारले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘ओबीसी’ आरक्षण देण्याबाबतचे समर्थन करणारे निवेदन समर्पित आयोगाचे प्रमुख बांठिया यांच्या नेतृत्वाखाली आयोगाचे सदस्य एच. बी. पटेल, नरेश गीते यांना दिले.
या वेळी भाजप ‘ओबीसी’ मोर्चा पुणे शहराचे प्रभारी गणेश कळमकर, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रल्हाद सायकर, दीपक माने, नंदकुमार गोसावी, यशोधन आखाडे, राजेंद्र पाषाणकर, विकी ढोले, स्मिता गायकवाड, दिनेश रासकर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r04701 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..