शिवांजली डान्स अकादमीतर्फे ‘नृत्योत्सव २०२२’ स्पर्धा संपन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवांजली डान्स अकादमीतर्फे 
‘नृत्योत्सव २०२२’ स्पर्धा संपन्न
शिवांजली डान्स अकादमीतर्फे ‘नृत्योत्सव २०२२’ स्पर्धा संपन्न

शिवांजली डान्स अकादमीतर्फे ‘नृत्योत्सव २०२२’ स्पर्धा संपन्न

sakal_logo
By

पुणे, ता. २२ ः शिवांजली डान्स अकादमीतर्फे आयोजित ‘नृत्योत्सव २०२२’ ही राष्ट्रीय नृत्य स्पर्धा नुकतीच पार पडली. भारतीय विद्या भवन येथे झालेल्या या स्पर्धेत पुणे, नाशिक, नागपूर, अकोला, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, चेन्नई अशा विविध शहरांमधील सुमारे १०६ स्पर्धक सहभागी झाले होते. भरतनाट्यम, कथक व सेमी क्लासिकल या तीन नृत्य प्रकारांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेची प्राथमिक फेरी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. पुण्यात झालेल्या अंतिम फेरीनंतर पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. शिवांजली डान्स अकादमीच्या संचालिका अनुजा बाठे-बनकर आणि सहसंचालिका योगिनी जोशी यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेच्या परीक्षक म्हणून नेहा आपटे आणि मुग्धा पाठक यांनी काम पाहिले. पारितोषिक वितरण समारंभाला ‘कीट्रोनिक्स इंडिया प्रायवेट लिमिटेड, पुणे’च्या संचालिका दीपा कुलकर्णी, हरिओम ज्युस बारचे सर्वेसर्वा विकास मोहरे आणि दीपाली मोहरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे श्रिया केळकर, ज्ञानेश्वरी मोहरे आणि शुभदा खेडकर सूत्रसंचालन यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r04939 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top