
‘जेएजी’ प्रवेश प्रक्रियेतील पात्रता निकषांमध्ये बदल
पुणे, ता. २२ ः भारतीय सैन्यदलाच्यावतीने ‘जज ॲडवोकेट जनरल’च्या (जेएजी) प्रवेश प्रक्रियेतंर्गत पात्रता निकषांमध्ये काही बदल करण्यात आले आहे. ते ‘जेएजी’च्या ३०व्या कोर्स आणि त्यापुढील प्रवेश प्रक्रियांसाठी असतील. याबाबतच्या सैन्यदलाच्या संकेतस्थळावर सूचना जारी करण्यात आली आहे. नव्या बदलानुसार आता उमेदवारांच्या ‘सामाईक विधी प्रवेश परीक्षे’चे (सीएलएटी) गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. याशिवाय ‘एलएलबी’च्या पदवीमध्ये किमान ५५ टक्के गुण असणे आवश्यक आहे. बार काउंसिल ऑफ इंडिया/राज्य मध्ये वकील म्हणून नावनोंदणी करण्यास पात्र असलेले व बार काउंसिल ऑफ इंडियाद्वारे मान्यता प्राप्त महाविद्यालयातून पदवी असलेल्या उमेदवारांना या प्रक्रियेत सहभाग होता येणार आहे.
ही प्रक्रिया पुरुष व महिला उमेदवारांसाठी आहे. ‘जेएजी’च्या एप्रिल २०२३ आणि ऑक्टोबर २०२३ दरम्यान सुरू होणाऱ्या कोर्ससाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ‘सीएलएटी’चे (पीजी) गुण सादर करणे आवश्यक आहे. त्यामुळे उमेदवारांना आता ही परीक्षा देणे अनिवार्य असेल.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22r04955 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..