महापालिकेत १४ वर्षांनंतर २७७ सेवक कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेत १४ वर्षांनंतर २७७ सेवक कायम
महापालिकेत १४ वर्षांनंतर २७७ सेवक कायम

महापालिकेत १४ वर्षांनंतर २७७ सेवक कायम

sakal_logo
By

पुणे, ता. २३ ः महापालिकेत रोजंदारीवर काम करणाऱ्या सेवकांना नोकरीत कायम सामावून घेण्यासाठी १२ वर्षांपासून न्यायालयीन लढाई आणि त्यानंतर कोरोनामुळे वाया गेलेली दोन वर्ष अशी १४ वर्षे गेली. त्यानंतर सुमारे २७७ कर्मचाऱ्यांना महापालिकेत कायम करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यामुळे २००७ पासून वादात सापडलेला मुद्दा निकाली लागला आहे.

पुणे महापालिकेत सलग पाच वर्षे रोजंदारीवर काम केलेल्या कर्मचाऱ्यास नोकरीत कायम केले जात होते. यासाठी पुणे महापालिका आणि पुणे महापालिका कामगार युनियनमध्ये १९९४ मध्ये करार झाला होता. २००७ मध्ये राज्य सरकारने धोरण बदलून रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेता येणार नाही. त्याचा फटका महापालिकेतील २८१ कर्मचाऱ्यांना बसला होता.
याविरोधात कामगार युनियनने औद्योगिक न्यायालयात २००७ मध्ये दावा दाखल केला, त्यावर २०१३ मध्ये औद्योगिक न्यायालयाने या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्यावा, असा आदेश दिला होता. याविरोधात महापालिका प्रशासनाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, पण त्यामध्ये औद्योगीक न्यायालयाच्या निर्णयास स्थगिती दिली नाही. त्यानंतर प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने आॅगस्ट २०१३ मध्ये दिलेल्या आदेशानुसार हा दावा उच्च न्यायालयापुढे पुन्हा निर्णयासाठी दाखल करण्याचे आदेश दिले. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या अंतरिम निर्देशानुसार उर्वरित कर्मचाऱ्यांना २९ नोव्हेंबर २०१३ रोजी बिगारी, झाडूवाला, कचरा मोटार बिगारी, जेसीबी ऑपरेटर, मोटार सारथी या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे आदेश दिले.
उच्च न्यायालयाने हे आदेश देऊनही महापालिका प्रशासनाने या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेतले नाही. त्यामुळे याविरोधात अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा युनियनने दिला होता. मात्र, कोरोनामुळे सर्व प्रक्रिया ठप्प झाली होती. आता महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी २७७ कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याचे आदेश काढले आहेत.

४० ते ४५ जन सेवानिवृत्त
रोजंदारीवरील कर्मचारी कायम सेवेत यावेत, यासाठी २००७ पासून प्रयत्न सुरू होते. पण अंतिम आदेश येण्यास २०२२ हे वर्ष उजाडले. या काळात २७७ पैकी ४० ते ४५ जण सेवानिवृत्त झाले. काही जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या वारसांना अनुकंप किंवा लाड पागे शिफारशीनुसार लाभ होणार आहे.

महापालिका आणि युनियनमध्ये झालेल्या करारानुसार पाच वर्षे रोजंदारीवर काम केल्यानंतर कर्मचारी कायम सेवेत करणे आवश्‍यक होते. पण, शासनाने धोरण बदलल्याने त्याचा फटका कर्मचाऱ्यांना बसला. याविरोधात औद्योगीक
न्यायालयात याचिका दाखल केली होती, यात कामगारांच्या बाजूने निकाल लागला होता. पण, त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. अखेर महापालिका आयुक्तांनी हा आदेश काढला आहे.
- उदय भट, महापालिका कामगार युनियन

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r05097 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top