‘यूजीसी नेट’च्या अर्जासाठी मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘यूजीसी नेट’च्या अर्जासाठी मुदतवाढ
‘यूजीसी नेट’च्या अर्जासाठी मुदतवाढ

‘यूजीसी नेट’च्या अर्जासाठी मुदतवाढ

sakal_logo
By

पुणे, ता. २३ : देशातील विद्यापीठे, वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेल्या ‘यूजीसी नेट’ परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता या परीक्षेसाठी येत्या ३० मेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्यातर्फे (यूजीसी) ‘राष्ट्रीय पात्रता परीक्षा’ (यूजीसी नेट) ही ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’मार्फत घेण्यात येते. या परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ दिल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष डॉ. एम. जगदेश कुमार यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. ही परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जाते. मात्र, कोरोनामुळे डिसेंबर २०२१ची परीक्षा पुढे ढकलली होती. त्यामुळे या परीक्षांच्या सत्रातील सातत्य कायम ठेवण्यासाठी डिसेंबर २०२१ आणि जून २०२२ ची परीक्षा एकत्रितरीत्या घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ मिळण्याची मागणी उमेदवारांकडून सातत्याने होत होती. या पार्श्वभूमीवर आयोगाने हा निर्णय घेतला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r05104 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top