अभिनेते प्रवीण तरडे यांना ‘बिझनेस आयडॉल’ पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभिनेते प्रवीण तरडे यांना ‘बिझनेस आयडॉल’ पुरस्कार
अभिनेते प्रवीण तरडे यांना ‘बिझनेस आयडॉल’ पुरस्कार

अभिनेते प्रवीण तरडे यांना ‘बिझनेस आयडॉल’ पुरस्कार

sakal_logo
By

पुणे, ता. २३ ः पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे यंदापासून देण्यात येणारा ‘बिझनेस आयडॉल’ पुरस्कार चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे यांना जाहीर झाला आहे. सोमवारी पत्रकार परिषदेत या पुरस्कारासह उत्कृष्ट व्यापारी व व्यापारी संघटना आणि व्यापारी कृतज्ञता पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली.
व्यापारी दिनानिमित्त बुधवारी (ता. २५) सातारा रस्त्यावरील अण्णा भाऊ साठे सभागृहात सकाळी दहा वाजता होणाऱ्या विशेष समारंभात या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. २०२०, २०२१ व २०२२ या तिन्ही वर्षांचे पुरस्कार या सोहळ्यात प्रदान केले जाणार आहेत.

१) उत्कृष्ट व्यापारी पुरस्कार ःदिलीप चोरगे, अरुण जोरे, संतोष बोरा, नवनाथ येवले, आनंद चोरडीया, निर्मल देशपांडे व नचिकेत बागल, प्रमोद दोषी, विमलेश गांधी, मैत्रेयी आठवले, सुभाष सरपाले, महेंद्रकुमार खाबीया, किरण शिंदे, जोरारामजी देवासी, संगीता ताई, किशोर सरपोतदार, मोडाराम साळंकी, पोलाराम बोराना, महेंद्र वालिया, मनोहर पंडित, समीर चव्हाण व अनिल कडमडकर.
२) उत्कृष्ट व्यापारी संघटना पुरस्कार ः कोथरूड व्यापारी संघटना, शिरूर तालुका व्यापारी संघटना आणि अखिल केशवनगर व्यापारी संघटना.
३) उत्कृष्ट व्यापारी कृतज्ञता पुरस्कार २०२२ ः श्याम आग्रवाल

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r05196 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..