
मागास प्रवर्ग मोर्चातर्फे ‘भारत बंद’ची हाक
पुणे, ता. २३ ः राष्ट्रीय मागास प्रवर्ग (ओबीसी) मोर्चाने बुधवारी (ता. २५) ‘भारत बंद’चे आयोजन केले आहे. केंद्र सरकारने इतर मागासवर्गीयांची (ओबीसी) जातीनिहाय जनगणना करावी, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या, खासगी क्षेत्रात एससी, एसटी, ओबीसींना आरक्षण लागू करावे, शेतकऱ्यांसाठी एमएसपी कायदा करावा, जुनी पेन्शन योजना लागू करावी, मध्यप्रदेश, ओरिसा आणि झारखंडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींसाठी स्वतंत्र मतदारसंघ असावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करणार आहे. या आंदोलनाला राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे, अशी माहिती राष्ट्रीय मागास प्रवर्ग (ओबीसी) मोर्चाचे पुणे संयोजक विठ्ठल सातव यांनी दिली.
छावा क्रांतिवीर सेनेतर्फे जन्मोत्सव सोहळा
पुणे, ता. २३ ः मुळशी तालुका छावा क्रांतिवीर सेनेतर्फे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (ता. २५) मिरवणूक व जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करणार असल्याची माहिती मुळशी तालुका छावा क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष तानाजी वाळंज यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. शिवस्मारक पौड येथे सकाळी नऊ वाजता छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. सायंकाळी चार वाजता पौड ते घोटावडे फाटा दरम्यान मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावेळी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती व सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, छावा क्रांतिवीर सेनेचे राज्यध्यक्ष करण गायकर, मुळशी तालुका सभापती पाडुरंग ओझरकर आदी उपस्थित राहणार आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22r05239 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..