मूत्रपिंडप्रकरणी ठोठावणार न्यायालयाचे दरवाजे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मूत्रपिंडप्रकरणी ठोठावणार न्यायालयाचे दरवाजे
मूत्रपिंडप्रकरणी ठोठावणार न्यायालयाचे दरवाजे

मूत्रपिंडप्रकरणी ठोठावणार न्यायालयाचे दरवाजे

sakal_logo
By

पुणे, ता. २३ : पुण्यात मूत्रपिंड प्रत्यारोपण प्रकरणात राज्याचे सार्वजनिक आरोग्य खाते न्यायालयात खटला दाखल करण्याची तयार करत आहे. त्याचा मसुदा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मूत्रपिंड प्रत्यारोपण प्रकरणी १५ लाखांचे आमिष एका महिलेला दाखविण्यात आले. मूत्रपिंड प्रत्यारोपण झाल्यानंतर पैसे न मिळाल्याने महिलेने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने याप्रकरणी पंधरा जणांवर गुन्हा दाखल केला. त्यात रूबी हॉल क्लिनिकमधील डॉक्टर, मूत्रपिंड देणारी महिला, त्यातील मध्यस्थी आणि मूत्रपिंड घेणाऱ्या रुग्णांचा समावेश आहे. या प्रकरणात पुढील दहा दिवसांमध्ये अंतिम अहवाल देण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. त्यानंतर आता वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. या प्रकरणात आता सार्वजनिक आरोग्य खाते न्यायालयात खटला दाखल करण्याची तयार करत आहे. त्यासाठी मसुदा तयार केला जात आहे. राज्य सरकारतर्फे हा खटला दाखल केला जाणार आहे, अशी माहिती मिळाली. मानवी अवयव व पेशी प्रत्यारोपण कायद्यान्वये प्राधिकृत अधिकाऱ्यांनी या प्रकरणी न्यायालयात खटला दाखल करणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्य सरकारतर्फे हे पाऊल उचलण्यात आल्याचे स्पष्ट केले.

समितीचे पोलिसांना पत्र
मूत्रपिंड प्रत्यारोपण प्रकरणाची चौकशी आरोग्य खात्यातर्फे सुरू करण्यात आली आहे. त्यात आतापर्यंत अवयव देणारी, ते घेणारे, या प्रकरणातील डॉक्टर, कर्मचारी यांचा जबाब घेण्यात आला आहेत. मात्र, यातील दोन मध्यस्थींचे जबाब अद्यापही झालेले नाही. ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे त्यांच्याशी बोलून अंतिम अहवाल सादर करण्यात येणार आहे. त्यासाठी समितीने पोलिसांना पत्र दिल्याची माहिती पुढे आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r05351 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..