सुनील देशपांडे यांना कार्यानेच श्रद्धांजली ः वीणा गोखले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुनील देशपांडे यांना कार्यानेच श्रद्धांजली ः वीणा गोखले
सुनील देशपांडे यांना कार्यानेच श्रद्धांजली ः वीणा गोखले

सुनील देशपांडे यांना कार्यानेच श्रद्धांजली ः वीणा गोखले

sakal_logo
By

पुणे, ता. २५ ः ‘‘संपूर्ण बांबू केंद्राच्या माध्यमातून आदिवासींना स्वयंपूर्ण करण्याचा यशस्वी प्रकल्प राबविणाऱ्या सुनील देशपांडे यांना कार्यानेच श्रद्धांजली अर्पण करणे समर्पक ठरेल,’’ असे प्रतिपादन ‘देणे समाजाचे’च्या संयोजिका वीणा गोखले यांनी केले.

देशपांडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मेळघाट मित्र मंडळातर्फे आयोजित वापरलेल्या कपड्यांचे संकलन मोहिमेच्या उद्‍घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. देशपांडे यांच्या कार्याचा आणि जीवनाचा परिचय करून देणाऱ्या एक छोटेखानी प्रदर्शनाचे उद्‍घाटन यावेळी झाले. मेळघाटातील लवादा आणि कोठा येथे ग्राम ज्ञानपीठाच्या माध्यमातून आदिवासींच्या कलागुणांचा विकास करणे, तसेच त्यांना संधी देऊन स्वयंपूर्ण करण्याचे कार्य संपूर्ण बांबू केंद्राच्या माध्यमातून सुनील देशपांडे यांनी १९९७ मध्ये सुरू केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण बांबू केंद्राच्या माध्यमातून आदिवासींतर्फे तयार केलेली पर्यावरणपूरक बांबूची राखी २०१८ मध्ये बांधून घेऊन त्यांच्या कार्याला दाद दिली होती.

महर्षी कर्वे रस्त्यावरील विमलाबाई गरवारे प्रशालेत वापरलेले, पण सुस्थितीतील आणि नवे कपडे या मोहिमेअंतर्गत गोळा करण्यात येणार असून ते मेळघाटातील लवादा येथील संपूर्ण बांबू केंद्राला पाठविण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त कर्जत (जि. अहमदनगर) येथील श्री दत्त योगीराज बहू उद्देशीय समाजमंदिर, यवतमाळ येथील नीड आणि जिनचे कपडे पूर्णम् इको या संस्थांना देण्यात येणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r05788 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top