
एलजी इलेक्ट्रॉनिक्स’तर्फे ‘आर ओएलईडी’ टीव्ही सादर
नवी दिल्ली, ता. २४ ः भारतातील आघाडीचा इलेक्ट्रॉनिक ब्रँड ‘एलजी इलेक्ट्रॉनिक्स’ने आपल्या बहुप्रतिक्षित ‘आर ओएलईडी’ टीव्हीचे नुकतेच बाजारात लॉन्चिंग केले आहे. या २०२२ मधील ओएलईडी टीव्हीमध्ये गेम शिफ्टिंगची सुविधा दिली आहे. ओएलईडी टीव्ही रेंजमध्ये प्रगत तंत्रज्ञान देण्यासाठी एलजी जागतिक स्तरावर ओळखले जाते.
एलजीने आतापर्यंत सादर केलेल्या विस्तृत श्रेणींमध्ये जगातील सर्वांत मोठ्या ‘ओएलईडी टीव्ही १’पासून ते १०६ सेंटीमीटर (४२ इंच) व २४६ सेंटीमीटर (९७ इंच) आकाराच्या ओएलईडी टीव्हींचाही समावेश आहे. हे टीव्ही उत्तम पिक्चर क्वॉलिटी, आकर्षक डिझाईनमुळे बाजारात प्रसिद्ध आहे. त्यातील वैविध्यपूर्ण लाईनअपमुळे टीव्ही गेम खेळणाऱ्या व्यक्तींसाठी फायद्याचा ठरतो. याशिवाय एलजीने ‘सी २’ सिरीजमध्ये ‘एलडी ओएलईडी इवो’चा सुद्धा समावेश केला आहे. ‘एलजी सिग्नेचर आर ओएलईडी टीव्ही’ रोलअपही केला जाऊ शकतो. त्याच्या या वैशिष्ट्यामुळे टीव्हीला कुठेही ठेवणे शक्य होते. या टीव्हीची रचना उपभोक्ता केंद्रित आहे. तसेच, यात वापरलेल्या वेबओएसमुळे ‘रूम टू रूम शेअर’ म्हणजेच वापरकर्त्यांना वाय-फायद्वारे त्यांच्या घरातील एका टीव्हीवरून दुसरा टीव्ही जोडता येतो. याशिवाय डॉल्बी व्हीजन आयक्यू आणि डॉल्बी अॅटमॉस या सुविधेमुळे, नेटफ्लिक्स, डिस्ने+ हॉटस्टार आणि डॉल्बीसह येणारे इतर अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्स उपलब्ध होतात. ओएलईडी टीव्ही ८९ हजार ९९० रुपयांपासून ते ७५ लाख या किंमत पट्ट्यात बाजारात उपलब्ध आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22r05862 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..