
‘आयडीए’तर्फे बालेवाडीत ‘डेंटल शो’
पुणे, ता. २५ : ‘इंडियन डेंटल असोसिएशन’च्या (आयडीए) मुख्य कार्यालयातर्फे ‘पुणे डेंटल शो’चे आयोजन केले आहे. ही अनोखी परिषद शनिवार (ता. २८) आणि रविवार (ता. २९) यादरम्यान बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे होणार आहे, अशी माहिती कार्यकारिणी अध्यक्ष आणि दंतरोग तज्ज्ञ डॉ. नितीन बर्वे यांनी दिली.
या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेचे कार्यकारिणी सचिव डॉ. रत्नदीप जाधव हे आहेत. ‘आयडीए’चे राष्ट्रीय पातळीवरील अध्यक्ष डॉ. पुनीत गिरिधर आणि राष्ट्रीय मानद सचिव डॉ. अशोक ढोबळे यात मार्गदर्शन करतील. यात देशभरातून पाच हजारांहून अधिक तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. आधुनिक दंतवैद्यकीय शस्त्रक्रियेसंदर्भात अनेक शोधनिबंध, दीडशेहून अधिक ट्रेड-स्टॉल्सची उभारणी ही या परिषदेची वैशिष्ट्ये आहेत.
दरवर्षी ३१ मे हा जागतिक तंबाखू विरोध प्रचारदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत पुणे, अकोला, अमरावती, मुंबई व नागपूर ‘आयडीए’ शाखेकडून भरविलेल्या तंबाखू निवारण उपक्रमांची माहिती, जनजागृती करणारी भित्तिपत्रके, तक्ते, चित्रे, घोषवाक्ये हे सर्व फोटोंसहित एका खास प्रदर्शनाद्वारे मांडण्यात येणार आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22r05905 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..