निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन अदालत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन अदालत
निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन अदालत

निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन अदालत

sakal_logo
By

पुणे, ता. २५ : राज्य सरकारी निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी पुणे कोशागार कार्यालयामार्फत बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून सर्वोपचार रुग्णालय येथील सभागृहात दोन जून रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत पेन्शन अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. या पेन्शन अदालतसाठी प्रधान महालेखाकार कार्यालय (लेखा व हक्कदारी) मुंबई कार्यालयाचे अधिकारी निवृत्तिवेतन संबंधी समस्या आणि मागण्यांचे निराकरण करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. पेन्शन संबंधी समस्या, अडचणी सोडविण्यासाठी निवृत्तिवेतन धारकांनी या अदालतमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा वरिष्ठ कोशागार अधिकारी शेखर शेटे यांनी केले आहे. प्रधान महालेखाकार कार्यालयाने निवृत्तिवेतन धारकांसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. साप्ताहिक ऑनलाइन पेन्शन संवाद, २४ तास उपलब्ध टोल फ्री क्रमांक १८००-२२ ००१४, २४ बाय ७ व्हाइस मेल क्रमांक ०२०-७११७७७७५, माहिती वाहिनी, पेन्शन सेवापत्र आणि जीपीएफ सेवापत्र, निवृत्तिवेतन धारकांकरिता समर्पित ई-मेल helpdesk.mh1ae@cag.govin या उपक्रमांची माहिती या कार्यक्रमात देण्यात येईल, असे शेटे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r06172 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top