पुणे जिल्ह्यात २७ शाळा अनधिकृत प्रवेश न घेण्याचे जिल्हा परिषद प्रशासनाचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे जिल्ह्यात २७ शाळा अनधिकृत  
प्रवेश न घेण्याचे जिल्हा परिषद प्रशासनाचे आवाहन
पुणे जिल्ह्यात २७ शाळा अनधिकृत प्रवेश न घेण्याचे जिल्हा परिषद प्रशासनाचे आवाहन

पुणे जिल्ह्यात २७ शाळा अनधिकृत प्रवेश न घेण्याचे जिल्हा परिषद प्रशासनाचे आवाहन

sakal_logo
By

पुणे, ता. २५ ः पुणे शहर व जिल्ह्यातील २७ शाळा अनधिकृतपणे चालविण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केलेल्या तपासणीत आढळून आले. या शाळांना सरकारी मान्यता नाही. जिल्हा परिषदेने या शाळांची यादी बुधवारी जाहीर केली. या शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संध्या गायकवाड यांनी केले आहे.
अनधिकृत शाळा : सुलोचनाबाई झेंडे बालविकास मंदिर व प्राथमिक विद्यालय- कुंजीरवाडी, बी. बी. एस. इंटरनॅशनल स्कूल-वाघोली, रिव्हर स्टोन इंग्लिश मीडियम स्कूल-पेरणे, व्ही. टी. एन. ई. लर्निंग स्कूल-भेकराईनगर, किड्स वर्ड इंग्लिश मीडियम स्कूल-फुरसुंगी, संस्कृती पब्लिक स्कूल (माध्यमिक)-उत्तमनगर, टन इंग्लिश मीडियम स्कूल-मांगडेवाडी, शिवसमर्थ इंग्लिश मीडियम स्कूल-मांगडेवाडी, ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल-आंबेगाव बुद्रूक, संस्कृती नॅशनल स्कूल-जांभूळवाडी रस्ता, संत सावता माळी प्राथमिक विद्यालय-लोणी काळभोर, पुणे इंटरनॅशनल पब्लिक स्कूल-लोणी काळभोर, द टायग्रेस स्कूल-कदमवाकवस्ती, ई-मॅन्युअल इंग्लिश स्कूल-खांदवेनगर (सर्व ता. हवेली). लिट्ल हार्ट इंग्लिश मीडियम स्कूल-सणसर, महात्मा फुले विद्यालय-निमगाव केतकी, गौतमेश्‍वर प्राथमिक विद्यालय-शेळगाव, शंभु महादेव विद्यालय-दगडवाडी, ईरा पब्लिक स्कूल-इंदापूर, विठ्ठलराव शिंदे विद्यालय-इंदापूर (सर्व ता.इंदापूर). जयहिंद पब्लिक स्कूल- भोसे (ता. खेड), सह्याद्री प्राथमिक विद्यालय-मेटलवाडी, डिवाईन विस्डम प्रायमरी स्कूल-वाकसई (दोन्ही ता. मावळ). सरस्वती प्री-प्रायमरी विद्या मंदिर/अल्फा एज्युकेशन हायस्कूल-पिरंगुट( ता. मुळशी). नवीन प्राथमिक शाळा -जेजुरी, शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल-राख (दोन्ही ता. पुरंदर) आणि आकांक्षा स्पेशल चाइल्ड स्कूल, रामलिंग रोड-शिरूर ग्रामीण (ता. शिरूर).

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r06271 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top