''पाटबंधाऱ्या''च्या नव्या कालव्यांना मिळकतकर? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''पाटबंधाऱ्या''च्या नव्या कालव्यांना मिळकतकर?
''पाटबंधाऱ्या''च्या नव्या कालव्यांना मिळकतकर?

''पाटबंधाऱ्या''च्या नव्या कालव्यांना मिळकतकर?

sakal_logo
By

पुणे, ता. २६ : खडकवासला धरणाचे कालवे पुणे शहरातून वाहत जातात, त्या शासकीय जमिनीला मिळकतकर लावण्याची प्रक्रिया सुरू आहे. कालव्यासाठी शहरातील किती क्षेत्र संपादित केले आहे याची माहिती मिळकतकर विभागाने पाणीपुरवठा विभागाला विचारली आहे. तसेच जुन्या कालव्याचा ६८ कोटी ४९ लाख ४९ हजार ५०१ रुपये मिळकतकर थकबाकी असल्याचेही मिळकतकर विभागाने स्पष्ट केले आहे.

पुणे महापालिकेकडून शहरातील शासकीय, खासगी मिळकती, मोकळ्या जागा, व्यावसायिक जागांना मिळकतकर लावला जातो. गेल्या वर्षभरात अनेक शासकीय संस्थांकडून मिळकतकराची थकबाकीसह चालू वर्षाचा कर देखील वसूल केला आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात महापालिकेने २१०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठरवलेले आहे. त्यासाठी महापालिकेने त्यादृष्टीने कर वसुलीचे नियोजन केले आहे.

पुणे महापालिकेच्या हद्दीतून खडकवासला पाटबंधारे विभागातील जुना व नवा कालवा वाहत आहे. ही जागा पाटबंधारे विभागाची असली तरी त्यावर मिळकतकर लावता येऊ शकतो. महापालिकेने जुन्या कालव्याला मिळकतकर लावला असून, त्याचा ६८ कोटी पेक्षा जास्त रकमेचा कर थकलेला असल्याची नोंद मिळकतकर विभागाकडे आहे. पण नव्या कालव्‍याचे एकूण क्षेत्र किती, पुणे शहराच्या हद्दीतून किती किलोमीटर लांबीचा कालवा गेलेला आहे याची माहिती मिळकतकर विभागाने पाणीपुरवठा विभागाला विचारली असून, त्याचे पत्र दिले आहे.

ठरवून दिलेल्या दरानुसार पाटबंधारेला पैसे
पाणीपुरवठा विभाग हे पाटबंधारे विभागाकडून केवळ पाणी घेऊन शुद्धीकरण करून त्याचे शहरात वितरण करते. तसेच त्यासाठी ठरवून दिलेल्या दरानुसार पाटबंधारेला पैसे दिले जातात. पण आमच्याकडे कालव्याचे क्षेत्रफळ किती याची माहिती नसल्याची भूमिका घेतली आहे. ही माहिती भूमी जिंदगी विभागाकडून मिळू शकेल, असे मिळकतकर विभागाला तोंडी कळविले असून, त्याचे पत्र देखील दिले जाणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.


कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळणे शक्य
पुणे महापालिकेची जुलै २०२१ मध्ये हद्दवाढ झाली, खडकवासला धरण आता महापालिकेच्या हद्दीत आले आहेत. तर मांजरीपर्यंतचा भागही महापालिकेत आला आहे. त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या कालव्याचे क्षेत्रफळ वाढले गेले आहे. या शासकीय जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम १३३ नुसार मिळकतकर आकारणे शक्य आहे. खडकवासला ते मांजरी हद्दीपर्यंतचे अंतर सुमारे ३० किलोमीटर इतके आहे, शासकीय दरानुसार कर आकारला तरी कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळणे शक्य आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r06366 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top