एक लाख रुपयांची मदत द्यावी : शेख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एक लाख रुपयांची मदत द्यावी : शेख
एक लाख रुपयांची मदत द्यावी : शेख

एक लाख रुपयांची मदत द्यावी : शेख

sakal_logo
By

पुणे, ता. २७ : कोरोनामुळे शहरातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाले असल्यास महापालिकेने नैतिक कर्तव्य म्हणून संबंधित कुटुंबीयांना १ लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी अली रझा यंग सर्कलचे तौसिफ शेख यांनी पत्रकार परिषदेत केली.
कोरोनामुळे पुण्यातील सुमारे ९ हजार ३०० व्यक्तींना जीव गमवावा लागला आहे. देशातील २१ राज्यातील कोरोना मृत्यूपेक्षा एकट्या पुणे शहरातील मृत्यू अधिक आहेत. कर्त्या व्यक्तीच्या निधनामुळे अनेक कुटुंबावर आर्थिक संकटांचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे संबंधितांच्या वारसांना किमान एक लाख रुपयाची आर्थिक मदत करावी. यासाठी महापालिकेला सुमारे ९० कोटी रुपये खर्च करावे लागतील. महापालिकेचा अर्थसंकल्प ८ हजार ५०० कोटींचा आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांना आर्थिक मदत शक्य आहे, असे शेख यांनी म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r06588 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top