
घाटातील दरडींवर १४५ सीसीटीव्हींची नजर
पुणे, ता. २६ : पुणे -मुंबई रेल्वे मार्ग पावसाळ्यात अधिक सुरक्षित करण्यासाठी रेल्वेने घाटात १४५ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम हाती घेतले आहे तर धोकादायक ठरू शकणाऱ्या तब्बल ५९४ ठिकाणच्या दरडी सुरक्षित केले जाणार आहे. रेल्वे प्रशासनातर्फे यातल्या काही दरडी हटविल्या जातील तर काहींना जाळ्या लावून सुरक्षित केल्या जात आहे.
उपयोगात नसलेले रूळाची एक प्रकारे भिंत बांधून बोगद्यांला आतून सुरक्षा दिली आहे. पावसाळ्यात दरवर्षी लोणावळा-कर्जत रेल्वे मार्गावर दरडी कोसळून रेल्वे वाहतूक ठप्प होती. तर काही वेळा मोठे दगड रूळावर आल्याने रुळांचे मोठे नुकसान होते. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने जवळपास ५८ बोगद्यात १४५ सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेतला असून, पैकी ८७ कॅमेरे बसविले गेले आहे. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळतात त्या ठिकाणी रुळांचे जाळे उभे केले आहे. त्यामुळे कोसळणाऱ्या दरडी रुळांना अडकून पडतील. त्याला ट्रॅकवर येण्यास मज्जाव होईल. परिणामी रेल्वे मार्ग बाधित होणार नाही.
नियंत्रण कक्षाचा मोठा आधार
पावसाळ्यात दरवर्षी बोरघाटात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. अंधाऱ्या रात्री दरडी वर नजर ठेवणे वा पडल्यावर त्याची नेमकी जागा शोधून काढणे हे खूप अवघड आहे. २८ किमीच्या मार्गावर ५८ बोगदे व तसेच देशातल्या रेल्वे मार्गांपैकी सर्वात तीव्र उतार व चढण असलेला हा भाग आहे. येथे काम करणे खूप आव्हानात्मक आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने ५८ बोगद्याच्या दोन्ही बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहे. त्यावर मुंबई येथील नियंत्रण कक्षातून नजर ठेवले जाते.
बोरघाटातील ५९४ दरडींचे स्क्रीनिंग
ज्या प्रमाणे मावळे दोरीचा आधार घेत किल्यावर चढत वा उतरत त्याप्रमाणे रेल्वेचे हिलगॅन्गचे पथकातील कर्मचारी दोरीचा आधार घेत घाटाच्या बाजूस दऱ्या कपाऱ्यात उतरतात. तिथून धोकादायक दरडी पाडली जाते. जेणेकरून पावसाळ्यात त्या ट्रॅकवर येऊ नये. आतापर्यंत बोरघाटातील ५९४ ठिकाणच्या दरडीचे स्क्रीनिंग केले आहे. त्यातल्या काही दरडी हटविले जातील. तर काही जाळ्याने सुरक्षित केले जाणार आहे.
दरडी कोसळून रेल्वे सेवा बाधित होऊ नये या करिता रेल्वे प्रशासनाने वेगवेगळ्या पातळीवर उपाययोजना केल्या आहेत. यात सीसीटीव्ही पासून ते हिलगॅन्गला प्रशिक्षण देण्यापर्यंतचा समावेश आहे. प्रवासी सुरक्षितता डोळ्यांसमोर ठेवून आम्ही उपाययोजत आहोत.
- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे मुंबई
66904, 66905
Web Title: Todays Latest Marathi News Pne22r06648 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..