कृषीतज्ज्ञांनी निवृत्तीनंतर ज्ञानाचा शेतकऱ्यांना फायदा करून द्यावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृषीतज्ज्ञांनी निवृत्तीनंतर ज्ञानाचा शेतकऱ्यांना फायदा करून द्यावा
कृषीतज्ज्ञांनी निवृत्तीनंतर ज्ञानाचा शेतकऱ्यांना फायदा करून द्यावा

कृषीतज्ज्ञांनी निवृत्तीनंतर ज्ञानाचा शेतकऱ्यांना फायदा करून द्यावा

sakal_logo
By

पुणे, ता. २७ ः ‘‘शेती हा व्यवसाय परवडेनासा झाल्याने शेतकरी अनंत अडचणीतून जात आहे. उत्पादनाला बाजारभाव मिळत नसतानाही खऱ्या अर्थाने मातीशी जुळलेल्या आणि शेतीशी जोडलेल्या व्यक्ती शेती व्यवसायात टिकून आहेत. कृषी तज्ज्ञांनी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतरही शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांना आपल्या ज्ञानाचा फायदा करून द्यावा,’’ असे आवाहन ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी नुकतेच केले.

ऊस संशोधक डॉ. सुरेश पवार लिखित ‘रसराज’ या आत्मचरित्रपर ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी साखर आयुक्त शेखर गायकवाड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू शंकर मगर, पुणे विभागाचे माजी आयुक्त विकास देशमुख, प्रभाकर देशमुख, नांदेडचे माजी जिल्हाधिकारी तानाजी सत्रे, यशदातील अधिकारी डॉ. बबन जोगदंड आदी उपस्थित होते.

यावेळी गायकवाड म्हणाले, ‘‘संशोधनविषयक कार्याच्या डॉक्युमेंटेशनमध्ये आपण मागे पडत आहोत. शेती संदर्भातील संशोधनात्मक कार्याच्या माहितीची नोंद झाली पाहिजे.’’ तसेच, ‘‘डॉ. सुरेश पवार यांचे हे केवळ आत्मचरित्र नसून शोधनिबंध आहे, जो सर्वार्थाने उपयुक्त आहे,’’ असे गौरवोद्गार डॉ. करमळकर यांनी काढले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r06696 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top