अण्णा भाऊ साठे लघुचित्रपट महोत्सवाचे उद्या आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अण्णा भाऊ साठे लघुचित्रपट महोत्सवाचे उद्या आयोजन
अण्णा भाऊ साठे लघुचित्रपट महोत्सवाचे उद्या आयोजन

अण्णा भाऊ साठे लघुचित्रपट महोत्सवाचे उद्या आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. २७ ः अण्णा भाऊ साठे आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सव समितीतर्फे पाचव्या ‘लघुचित्रपट महोत्सवा’चे रविवारी (ता. २९) आयोजन करण्यात आले आहे. विधी महाविद्यालय रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे हा महोत्सव पार पडणार आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत लघुचित्रपटांचे स्क्रीनिंग होणार असून त्यानंतर पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन लेखिका संध्या गोखले यांच्या हस्ते होणार असून दिग्दर्शक सुनील सुकथनकर आणि नितीन सुपेकर या महोत्सवाचे परिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. तर पारितोषिक वितरण सोहळ्याला अभिनेते किरण माने, अंकुश मांडेकर, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, फॅन्ड्री चित्रपटाचे निर्माते निलेश नवलखा आदी उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवाचा रसिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन मुख्य आयोजक सचिन बगाडे आणि महोत्सवाचे दिग्दर्शक संदीप ससाणे यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r06977 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top