''बनकर क्रीडा संकुलातील तलाव खुला करा'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''बनकर क्रीडा संकुलातील तलाव खुला करा''
''बनकर क्रीडा संकुलातील तलाव खुला करा''

''बनकर क्रीडा संकुलातील तलाव खुला करा''

sakal_logo
By

पुणे : गेली पाच वर्षे बंद असलेला हडपसर येथील कै.रामचंद्र अप्पा बनकर क्रीडा संकुलातील जलतरण तलाव लोकांच्या वापरासाठी लवकरच खुला करावा, अशी मागणी शहर काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे अध्यक्ष प्रशांत सुरसे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना भेटून केली. त्यावर तलाव लवकरच सुरू करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी शिष्टमंडळाला दिले. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते २६ डिसेंबर २०१६ रोजी या क्रीडा संकुलाचे लोकार्पण करण्यात आले. संकुलात आर.आर.पाटील जलतरण तलाव, स्वर्गीय विलु पूनावाला बॅडमिंटन हॉल आणि व्यायामशाळा आदी सुविधा आहेत. कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेला हा प्रकल्प पाच वर्षे बंदच ठेवण्यात आलेला आहे. प्रकल्प बंद असतानाही देखभालीसाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. जलतरण तलाव पाच वर्षात एकदाही सुरू नसताना त्याच्या देखभालीसाठी ३० लाख रुपये खर्च करण्यात आले, सुरसे सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r07012 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top