
एस. नरेन यांच्याकडूनन ‘पीआयएफएए’चे कौतूक
पुणे, ता. २८ ः आयसीआयसीआय प्रुडेन्शियलचे कार्यकारी संचालक आणि मुख्य माहिती अधिकारी एस. नरेन यांच्या हस्ते पुणे इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल अॅम्बेसेडर्स असोसिएशनच्या (पीआयएफएए) ‘स्ट्राइव्हिंग सक्सेस स्टोरीज’ या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले.
यावेळी बोलताना एस. नरेन यांनी म्युच्युअल फंड गुंतवणूक उत्पादन म्हणून लोकप्रिय करण्याच्या उल्लेखनीय प्रयत्नांसाठी ‘पीआयएफएए’चे कौतुक केले. तसेच, ‘जोपर्यंत यूएस फेड महागाईचे व्यवस्थापन करण्यावर लक्ष केंद्रित करत नाही तोपर्यंत इक्विटी मार्केट अस्थिर राहण्याची शक्यता आहे’, असे मत त्यांनी मांडले. तर, ‘आयसीआयसी प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाच्या मदतीने पुण्यातील एमएफडी नेत्यांच्या कथा या पुस्तकाच्या रूपात आम्ही समोर आणू शकलो याचा आम्हाला आनंद आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या प्रवासात त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत’, असे पीआयएफएएचे माजी अध्यक्ष हर्षवर्धन भुसारी यांनी सांगितले.
या पुस्तकात भरत फाटक आणि अमित बिवलकर आणि इतर ३५ नामांकित व्यक्तींच्या प्रवासाचा इतिहास मांडला. त्यांच्या प्रवासावर चिंतन करण्यासह हे पुस्तक भविष्यातील आर्थिक सल्लागारांसाठी महत्त्वाचे आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22r07276 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..