वीजबिल भरल्याशिवाय तरणोपाय नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीजबिल भरल्याशिवाय तरणोपाय नाही
वीजबिल भरल्याशिवाय तरणोपाय नाही

वीजबिल भरल्याशिवाय तरणोपाय नाही

sakal_logo
By

पुणे, ता. २९ : वीजक्षेत्रात आर्थिक शिस्त अतिशय महत्त्वाची आहे. दिवसेंदिवस विजेची मागणी वाढत आहे. त्यासाठी पायाभूत यंत्रणा उभारण्यात येत आहे. मात्र वीजबिलांची वसुली झाली नाही तर यंत्रणांचे विस्तारीकरण व सक्षमीकरण तसेच सुरळीत वीजपुरवठा करण्यामध्ये आर्थिक अडचणी येतात. त्यामुळे वीजबिलाचा भरणा केल्याशिवाय तरणोपाय नाही, असे मत पालकमंत्री व जिल्हा विद्युत वितरण नियंत्रण समितीचे अध्यक्ष अजित पवार यांनी व्यक्त केले.

जिल्हा विद्युत नियंत्रण समितीची बैठक पवार यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी पवार यांनी लोकप्रतिनिधी तसेच समितीच्या सदस्यांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्यांच्या अनुषंगाने सूचना देत जिल्ह्यातील वीजविषयक कामांचा आढावा घेतला. राज्य शासनाने कृषिपंप वीजजोडणी धोरणांतर्गत सवलत योजना, थकबाकी व वीजबिलांचा भरणा केल्यानंतर ग्रामपंचायती व जिल्ह्यांमध्ये जमा होणाऱ्या आकस्मिक निधीतून करण्यात येत असलेली कामे यांची माहिती पवार यांनी दिली. तसेच लोकप्रतिनिधींनी देखील वीजबिलाबाबत आर्थिक शिस्त व बिल भरण्याची आवश्यकता समजून सांगावी, असे आवाहन लोकप्रतिनिधी यांना पवार यांनी केले
यावेळी आमदार अशोक पवार, चेतन तुपे, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, संजय जगताप, सुनील टिंगरे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, मुख्य अभियंता सचिन तालेवार आदी उपस्थित होते.

समितीचे सदस्य सचिव तालेवार यांनी पुणे जिल्ह्यातील वीजविषयक विविध योजनांचे सादरीकरण केले. समितीच्या मागील बैठकीत झालेल्या निर्णयानुसार वाघोली परिसरात दोन नवीन उपकेंद्र प्रस्तावित केली आहेत व या दोन्ही उपकेंद्रांना पाच नवीन उच्चदाब वीजवाहिन्यांद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r07444 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top