कोरोनाबाधितांमध्ये पुन्हा सौम्य वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाबाधितांमध्ये पुन्हा सौम्य वाढ
कोरोनाबाधितांमध्ये पुन्हा सौम्य वाढ

कोरोनाबाधितांमध्ये पुन्हा सौम्य वाढ

sakal_logo
By

पुणे, ता. २९ : राज्यात एप्रिलच्या मध्यापासून कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दर आठवड्याला सौम्य वाढ दिसून येत आहे. गेल्या सलग सहा आठवड्यांपासून वाढणारे कोरोनाबाधितांच्या आकड्यांकडे दुर्लक्ष करू नका, असे आवाहन राज्याच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
राज्यात कोरोनाच्या तीन लाटांचा उद्रेक आतापर्यंत झाला आहे. आता पुन्हा रुग्णसंख्या वाढत असली तरीही ही चौथ्या लाटेची सुरवात नसल्याचे आरोग्य खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यात जानेवारीपासून कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा उद्रेक झाला. त्यानंतर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. मात्र, या व्हेरियंट श्वसनसंस्थेच्या वरच्या भागापुरताच मर्यादित राहिला. यापूर्वी पहिल्या लाटेत आलेल्या अल्फा आणि दुसऱ्या लाटेत थैमान घातलेल्या डेल्टा व्हेरियंटचे रुग्णांचे थेट फुफ्फुसावर हल्ला केला होता. त्या तुलनेत तिसऱ्या लाटेतील ओमिक्रॉन व्हेरियंट सौम्य असल्याचे जाणवले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची गरज लागली नाही. त्यानंतर मार्चपासून रुग्णसंख्या सातत्याने कमी होऊ लागली.

का वाढ झाली?
- कोरोनाची साथ आता एन्डामिक झाली आहे. याचा अर्थ, अशा प्रकारचे कमी-अधिक प्रमाणात रुग्ण आढळत राहातील.
- सध्या आढळणारे रुग्णांना ओमिक्रॉन याच व्हेरियंटचा संसर्ग होत आहे. त्यामुळे रुग्णांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करावे लागत नाही.

काय काळजी घ्यावी?
- नागरिकांनी कोरोना संसर्गाबाबत हालगर्जीपणा करू नये
- गर्दीच्या ठिकाणी, रुग्णालयात, दवाखान्यात जाताना मास्क वापरावा
- राज्याचे मास्कची सक्ती केली नसली तरीही सार्वजनिक ठिकाणी त्याचा वापर करावा
- कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी
- वारंवार हात स्वच्छ पाण्याने धुवावे
- नाक, तोंड याला वारंवार हाताने स्पर्श करू नये

राज्यात असे वाढले रुग्ण
महिना .......... कोरोनाबाधित रुग्णसंख्या
मार्च ............ ७,६४४
एप्रिल .......... ३,५८५
२९ मेपर्यंत .... ८.०४३
(स्त्रोत : सार्वजनिक आरोग्य विभाग)

आकडे बोलतात
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण : ९८.०९ टक्के
राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर : १.८७ टक्के
कोरोना संसर्गाचा दर : ९.७५ टक्के
आतापर्यंत तपासण्यात आलेले प्रयोगशाळा नमुने : ८,०८,८९,१२८
कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या : ७८,८५,९४४
राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या : २९९७

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r07525 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top