
करियर-विमान क्षेत्र
करियरची आकाशातही भरारी!
सध्याच्या जगात कोणाला जास्त पगाराची नोकरी करायची, भरमसाठ असा पगार घेऊन कंपनीने दिलेल्या सोयीसुविधा वापरून जगभर फिरायची इच्छा नाही?... प्रत्येकाला तशी इच्छा असते. जिद्द, चिकाटी आणि आवड यांच्या जोरावर आजच्या जगात प्रत्यक्षात हे मिळवणे तितकेच शक्यही आहे. होय ही संधी तुम्हाला मिळू शकते फक्त आणि फक्त एअर ट्रॅव्हल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील उपलब्ध व्यवसाय प्रशिक्षणातून...
- योगेश व्यवहारे
---
विमान वाहतूक क्षेत्र हे जगातील सर्वात आकर्षक आणि सर्वोत्तम पगाराचे क्षेत्र आहे. भारतातील विमान प्रवास उद्योग हा जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी देशांतर्गत प्रवासी विमान वाहतूक करणारी इंडस्ट्री आहे. जगातील विमान कंपन्या वर्षाला ३ अब्ज प्रवासी वाहतूक करतातआणि विमान वाहतूक उद्योगात एक कोटी थेट नोकऱ्या आहेत. जागतिक प्रवास आणि पर्यटन परिषदेने म्हटले आहे, कि जागतिक पर्यटन क्षेत्रात पुढील दहा वर्षात जवळपास एक अब्जाहून अधिक नोकऱ्या निर्माण होण्याचे संकेत आहेत. कोरोनाकाळानंतर भारत सरकारच्या विविध मंत्रालयांच्या वतीने पर्यटन, विमान वाहतूक आणि समुद्री पर्यटन यांना चालना देण्यासाठी विविध योजना सुरु करण्यात आल्या असून, त्यातूनही येणाऱ्या काळामध्ये विमान प्रवास आणि पर्यटन तसेच हॉस्पिटॅलिटी क्षेत्रामध्ये नोकरीच्या हजारो संधी उपलब्ध होणार आहेत.
बारावी पास विद्यार्थ्यांसाठी एक वर्ष विमान प्रवास, पर्यटन आणि हॉटेल व्यवस्थापन मधील प्रशिक्षण व कौशल्य विकास आधारित कोर्सेस तसेच योग्य मार्गदर्शन तुम्हाला या क्षेत्रात चांगल्या पगाराची तुमच्या आवडीची नोकरी तुम्हाला मिळवून देऊ शकते. पुण्यातही एअर होस्टेस, केबिन क्रू, एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ प्रशिक्षण, एअरलाइन तिकिट बुकिंग, ट्रॅव्हल अँड टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट आदी एक वर्षाचे कौशल्य आधारित कोर्सेस उपलब्ध आहेत.
भारत सरकारकडून स्वदेश दर्शन, प्रशाद स्कीम, नभ निर्माण, उडान, आझादी का अमृत महोत्सव, अतुल्य भारत, एक भारत, श्रेष्ठ भारत यांसारखे कार्यक्रम राबवले जात आहेत. याचबरोबर आताच डेनमार्क मध्ये झालेल्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशातील भारतीयांना तेथील अभारतीय लोकांना भारत पर्यटनासाठी आमंत्रित करण्यास प्रोत्साहित केले आहे. एकप्रकारे पर्यटन विमान प्रवास आणि हॉटेल इंडस्ट्री यामधील उद्योगवाढीस याठिकाणी चालना मिळत आहेच. या सर्व धोरणांमुळे या क्षेत्रातील नोकरभरतीच्या संधीही आगामी काळामध्ये वाढणार आहेत आणि अशा परिस्थिती मध्ये कौशल्य संपन्न उमेदवारांसाठी ही एक पर्वणीच असेल.
या क्षेत्रातील विविध तज्ज्ञांच्या मते येणाऱ्या काळामध्ये रिजनल कनेक्टिव्हिटी अंतर्गत होणारी एअरपोर्टच्या संख्येतील वाढ, विस्तारीकरण आणि नवीन बांधणी, तसेच नव्याने सुरू होत असलेल्या विमान कंपन्या, विमान कंपन्यांच्या आधीच्या विमान संख्येमध्ये होत असेलली वाढ, विमान प्रवास करणारे प्रवासी संख्येमधील वाढ, वाढत चाललेले पर्यटन आणि विकास यामुळे नक्कीच आपले कायम आकर्षण असलेले विमानसेवा, पर्यटन क्षेत्रामध्ये नोकरी करून जग फिरण्याचे, इंजिनियर आणि डॉक्टरप्रमाणेच उत्तम पगार घेऊन आपली स्वप्न साकार होऊ शकणार आहे. आपल्या आई वडिलांना, पालकांना आपल्या मुला-मुलीचे कौतुक वाटेल, असा हा करियरचा उत्तम पर्याय आहे. आणि एकदा ही संधी मिळाली, कि तुम्ही नक्की म्हणाल, ‘‘आसमान भी मुझसे नीचे उडेगा, मेरे होंसलोमे इतनी ताकत है... ‘‘द स्काय इज नॉट द लिमिट!’’
---
विमान वाहतूक क्षेत्रातील संधी
- एअरहोस्टेस
- केबिन क्रू,
- एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ,
- कस्टमर सर्व्हिस एक्सिक्युटिव्ह,
- एअरलाइन टिकेटिंग एक्सिक्युटीव्ह
-----
ट्रॅव्हल अँड टुरिझममधील संधी
- ट्रॅव्हल कन्सल्टन्ट,
- टूर मॅनेजर,
- फॉरेक्स , व्हिजा एक्सिक्युटीव्ह,
- ट्रान्सपोर्ट एक्सिक्युटीव्ह
-----
हॉटेल इंडस्ट्री
- फ्रंट डेस्क एक्सिक्युटीव्ह, ट्रॅव्हल डेस्क एक्सिक्युटीव्ह, गेस्ट सर्विस एक्सिक्युटीव्ह, रिझर्वेशन एक्सिक्युटीव्ह, सेल्स ॲन्ड मार्केटिंग एक्सिक्युटीव्ह, फूड अँड बेव्हरेज सर्व्हिस टीम लीडर. या व्यतिरिक्त इव्हेंट मॅनेजमेंट, कार्गो मॅनेजमेंट आणि क्रूझ मॅनेजमेंटमध्ये खूप साऱ्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत, तेही १२ वी नंतर एक वर्षाच्या प्रशिक्षणावर आधारित.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22r07744 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..