गणिताची भीती घालवा : गिरीश पतके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणिताची भीती घालवा : गिरीश पतके
गणिताची भीती घालवा : गिरीश पतके

गणिताची भीती घालवा : गिरीश पतके

sakal_logo
By

पुणे, ता. ३० ः ‘मागच्या पिढीला गणिताची भीती होती. पाढे शिकून ती घालवायला हवी’, असे मत राज्य मराठी विकास संस्थेचे कार्यासन अधिकारी गिरीश पतके यांनी नुकतेच व्यक्त केले.

मॅप एपिक कम्युनिकेशन्स आणि राज्य शासनाची ‘राज्य मराठी विकास संस्था’ यांच्यातर्फे आयोजित अंकनाद पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धेच्या (पर्व-३) पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. मॅप एपिक कम्युनिकेशन्स आणि स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यातर्फे आयोजित ‘विज्ञान आख्यान’ उपक्रमातील नाटिकांचे तसेच वैज्ञानिक प्रयोगांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. मॅप एपिक कम्युनिकेशन्सचे संस्थापक मंदार नामजोशी यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. ऋतुजा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजय ढोले, सायन्स पार्कचे संचालक राजेंद्र तुपे, नंदराज कोळेकर, निर्मिती नामजोशी, अवधूत गोडबोले, वैशाली लोखंडे, जगदीश जाधव आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r07789 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top