दुचाकी घसरण्याचे प्रकार टाळण्यासाठी पालिकेने उपाययोजना कराव्यात : आप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुचाकी घसरण्याचे प्रकार टाळण्यासाठी
पालिकेने उपाययोजना कराव्यात : आप
दुचाकी घसरण्याचे प्रकार टाळण्यासाठी पालिकेने उपाययोजना कराव्यात : आप

दुचाकी घसरण्याचे प्रकार टाळण्यासाठी पालिकेने उपाययोजना कराव्यात : आप

sakal_logo
By

पुणे, ता. ३१ : नागरिकांनो पहिल्या पावसानंतर वाहने सावधगिरीने चालवा; कारण सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या पीएमपीच्या बसमधील इंधन गळती, कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून पडणाऱ्या लिचडमुळे दुचाकी वाहने घसरण्याचे प्रकार दरवर्षी होतात. हे प्रकार टाळण्यासाठी महापालिकेने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन आम आदमी (आप) पक्षाने केली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील एक, दोन दिवसांत पावसाची शक्यता आहे. कचरा डेपोमधून व गळक्या कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे तेल युक्त द्रव्य सातत्याने पौड रस्त्यावर वाहून येते. ते घट्ट होऊन त्याचा थर पीएमपीच्या कोथरूड डेपोकडून वनाजकडे जाणाऱ्या रस्त्यावर जमा होतो. पावसात त्यावरुन दुचाकी वाहने घसरून अपघात होतात, असे पक्षाचे विजय कुंभार यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r07907 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top