MPSC : विद्यार्थ्यांची ट्वीटर जागृती मोहीम, हजार पदांचा समावेश करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MPSC Exam
एमपीएससीचे विद्यार्थी आज ट्विटर मोहीम राबविणार राज्यसेवा परीक्षेत एक हजार पदांचा समावेश करण्याची मागणी

MPSC : विद्यार्थ्यांची ट्वीटर जागृती मोहीम, हजार पदांचा समावेश करण्याची मागणी

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ ही वस्तुनिष्ठ बहूपर्यायी पद्धतीने होणारी शेवटची परीक्षा आहे. पुढच्या वर्षी ही परीक्षा वर्णनात्मक स्वरूपात होणार आहे. तसेच अनेक विद्यार्थ्यांना शेवटची संधी आहे. त्यामुळे या परीक्षेच्या पद संख्येत वाढ करावी. या मागणीकडे सोमवारी (ता.१२) राज्यसरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘ट्विटर जागृती मोहीम’ राबविणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून ही मोहीम सोमवारी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत राबविली जाणार आहे. राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये अनेक पदे रिक्त आहेत. तसेच सरकारने एमपीएससीला ५०१ जागांचे मागणीपत्र पाठवले आहे. त्यामुळे या पदांचा समावेश केला, तर राज्य सेवा परीक्षा एक हजार पदांसाठी होऊ शकते. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना संधी मिळू शकते. राज्य सेवा २०२२ ही परीक्षा १६१ पदांसाठी जाहीर झाली होती. त्यावर विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला होता. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट फोन करून राज्य सेवा परीक्षेत पदांची संख्या वाढविण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत ३४० पदांचा समावेश केला होता. त्यानुसार आता २१ संवर्गातील एकूण ५०१ पदांसाठी परीक्षा होत आहे. ११ संवर्गातील पदांचे मागणीपत्र एमपीएससीला पाठवले गेले नाही. ते पाठवले तर जागा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने तत्काळ मागणीपत्र पाठवावे आणि एकूण एक हजार पदांची परीक्षा घ्यावी, असे सुमेध पाटील आणि राम आडे या विद्यार्थ्यांनी सांगितले.

विद्यार्थी म्हणतात....
- मुख्यमंत्र्यांनी एमपीएससीकडून १०० टक्के पदभरतीला मान्यता दिली आहे
- मात्र सरकारी विभाग रिक्त पदांचे मागणीपत्र एमपीएससी पाठविण्याबाबत उदासीन
- हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील राज्यसेवा २०२२ ही शेवटची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा ठरणार
- ३२ संवर्गातील रिक्त पदांचे मागणीपत्र तत्काळ एमपीएससीला पाठवावीत
- या वर्षी ११ हजार २६ पदे एमपीएससीकडून भरली जातील, असे मंत्र्यांनी जाहीर केले असून अधिकाऱ्यांनी त्याचे पालन करावे
- नायब तहसीलदार, मुख्याधिकारी गट ब, उद्योग अधिकारी, कामगार विभागातील पदे, कौशल्य विकास अधिकारी, मंत्रालय कक्ष अधिकारी आदी रिक्त पदांचे मागणीपत्र एमपीएससीला पाठवावे

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r65754 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune NewspuneTwittermpsc