Pune : ‘सीईटी’चा निकाल जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CET
‘सीईटी’चा निकाल जाहीर

Pune : ‘सीईटी’चा निकाल जाहीर

पुणे : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी कक्ष) शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता उच्च व तंत्रशिक्षण विभागातील विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात आल्या आहेत. त्यामधील बी. एड. -एम. एड, बी. पी. एड., एल. एल. बी (५ वर्ष), एम. एड, एल. एल. बी-(३ वर्ष), बी. ए. बी. एस्सी, बी. एड, एमसीए, एमएचटी-सीईटी, एमबीए/ एमएमएस, आणि बी. एड (सामान्य व विशेष) या प्रवेश परीक्षांचा निकाल जाहीर करण्याचा वेळापत्रक सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.

त्यानुसार बी. ए. बी. एड., बी. एड.- एम. एड, एम. एड, बी. एचएमसीटी, बी. प्लॅनिंग, एम. आर्य., एम. एचएमसीटी या परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. उर्वरित परीक्षांचा निकाल ही लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ज्या अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे, अशा अभ्यासक्रमांची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर सुरू होणार आहेत, अशी माहिती सीईटी सेलचे आयुक्त रवींद्र जगताप यांनी दिली. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी सीईटी कक्षाच्या ‘www.mahacet.org’ या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहनही सीईटी कक्षाने केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22r65781 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..